वैद्यकीय उपकरणे महाग असण्याचे कारण काय? जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 09:57 AM2021-06-29T09:57:15+5:302021-06-29T09:58:02+5:30
निर्जंतुकीकरणाच्या उपकरणांवर भार ५५.८ टक्के आयात शुल्क आकारतो. हेच अमेरिका केवळ २ टक्के आकारते. म्हणजेच, हे आयात शुल्क कमी झाले तर अशा उपकरणांचे दर अर्ध्याने कमी होऊ शकतील.
कोरोनाने जगभरातील सर्व देशांच्या नाकी नऊ आणले आहेत. जो तो देश हा साथरोग आटोक्यात कसा येईल, यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध देशांतून वैद्यकीय उपकरणे वा तत्सम साहित्यांची आयात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या उपकरण वा वस्तूंच्या आयातीवर शुल्क आकारणी करण्यात भारत अग्रेसर असल्याचे नुकत्याच एका पाहणीत स्पष्ट झाले आहे.
जगात सर्वाधिक आयात शुल्क आकारणी भारतातच
उत्पादन आणि आयात शुल्क आकारणीची टक्केवारी
वस्तू भारत चीन अमेरिका अल्प-मध्यम जगभरातील
उत्पन्न सरासरी
असलेले देश
कोरोनाचाचणी संच आणि उपकरणे ६.९% २.९% १.३% ३% २.८%
निर्जंतुकीकरणाची उपकरणे ५५.८% ११.५% २% १७.५% १२.८%
प्राणवायू ७.८% ५% ३.७% ६.७% ६%
इतर वैद्यकीय उपकरणे ८% ५.३% ०% ५.३% ४.४%
(इन्फ्रारेड थर्मोमीटर्स)
वैद्यक क्षेत्राशी संबंधित इतर वस्तू ९.८% ४.९% १.३% ७.४% ६.१%
(वैद्यकीय वायूचे रिकामे सिलिंडर्स)
प्राणवायू उपचारपद्धतीशी संबंधित ५.६% २.५% ०% ३.६% ३.१%
उपकरणे व पल्स ऑक्सिमीटर्स
सुरक्षात्मक प्रावरणे १३.३% ७% ४.४% १४.१% ११%
व्हीलचेअर्स आणि फिरते दवाखाने १०% ६.८% ०% ३.२% २.९%
कोरोनाशी संबंधित सर्व वस्तू १५.२% ६.३% १.८% ९.३% ७.३%
लस उत्पादन आणि वितरण ९.३% ६.६% १.३% ७.५% ६.२%
निर्जंतुकीकरणाच्या उपकरणांवर भार ५५.८ टक्के आयात शुल्क आकारतो. हेच अमेरिका केवळ २ टक्के आकारते. म्हणजेच, हे आयात शुल्क कमी झाले तर अशा उपकरणांचे दर अर्ध्याने कमी होऊ शकतील.
व्हीलचेअर्सवर सरकार १० टक्के आयातशुल्क आकारते. अमेरिका या वस्तूवर एक टक्काही आयात शुल्क घेत नाही.