राष्ट्रवादीचे काय? हा लाखमोलाचा प्रश्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:04 AM2017-08-11T01:04:03+5:302017-08-11T01:04:20+5:30
तुम्हाला ४४वे मत कोणाचे मिळाले? राष्ट्रवादी काँग्रेसचे काय? या प्रश्नाला थेट उत्तरे न देता अहमद पटेल इतकेच म्हणाले, ‘मिलियन डॉलर क्वेश्चन’ (लाखमोलाचा प्रश्न) आणि दिलखुलास हसले. त्यांचे सूचक उत्तर बरेच काही सांगून गेले.
नवी दिल्ली : तुम्हाला ४४वे मत कोणाचे मिळाले? राष्ट्रवादी काँग्रेसचे काय? या प्रश्नाला थेट उत्तरे न देता अहमद पटेल इतकेच म्हणाले, ‘मिलियन डॉलर क्वेश्चन’ (लाखमोलाचा प्रश्न) आणि दिलखुलास हसले. त्यांचे सूचक उत्तर बरेच काही सांगून गेले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रफुल पटेल पक्षाचे आमदार जयंत पटेलांचे मत अहमदभार्इंना मिळाल्याचे
सांगत होते. मात्र त्यांच्या दाव्यावर काँग्रेस खासदारांचा विश्वास नव्हता. राष्ट्रवादीचे एकही मत अहमदभार्इंना मिळाले नाही, अशीच चर्चा काँग्रेसमध्ये गुरुवारी होती.
गुजरातमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर अहमद पटेलांचे संसदेत आगमन झाले,
त्यावेळी विविध पक्षांच्या खासदारांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. \
संसदेत आल्यानंतर पत्रकारांचा गराडा अहमदभार्इंभोवती पडला. एरवी पत्रकारांशी बोलणे टाळणाºया अहमदभार्इंनी आज प्रश्नांना सूचक शब्दांत मोकळेपणाने उत्तरे दिली.
विजयाची खात्री होती
तुम्हाला पराभूत करण्यासाठी अमित शहा प्रतिष्ठा पणाला लावतील याची अपेक्षा होती काय?
अजिबात नाही. त्यांना असे का करावेसे वाटले, याची कल्पना नाही. बहुधा गुजरात विधानसभेची निवडणूक त्यांच्या डोळ्यांसमोर असावी.
आपला पराभव होऊ शकतो असे तुम्हाला वाटले काय?
नाही. कोणी कितीही प्रयत्न केले तरी मी हमखास विजयी होणार, याची पहिल्या दिवसापासून मला खात्री होती.
आपल्या विजयानंतर सेनेच्या संजय राऊ त यांची प्रतिक्रिया ऐकली काय?
- नाही, काय म्हणाले ते?
त्यावर अहमद पटेल यांच्या पराभवासाठी भाजपाने जी शक्ती लावली तेवढी डोकलामच्या सीमेवर
लावली असती तर चिनी
सैन्य कधीच पळून गेले
असते, ही राऊ त यांची प्रतिक्रिया ऐकताच अहमदभार्इंसह सारेच हास्यकल्लोळात बुडाले.