१५ ते १९ वयोगटात किती टक्के मुलींना सेक्सचा अनुभव?; नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेची धक्कादायक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 03:29 PM2023-03-21T15:29:49+5:302023-03-21T15:30:47+5:30
मुलींचे लग्नाचे सरासरी वय अजूनही मुलांच्या तुलनेत कमी असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते
नवी दिल्ली - माझा देश बदलतोय, लोकांचा विचार बदलतोय पण या बदलत्या विचारांसोबतच काही अनपेक्षित बदल धक्कादायक आहेत. लैंगिक अनुभवाच्या बाबतीत देशातील महिला पुरुषांपेक्षा पुढे आहेत. देशात १५ ते १९ वयोगटातील १५.१% मुलींनी सेक्सचा अनुभव घेतला आहे, तर त्याच वयोगटातील केवळ ७.७% मुलांनी सेक्स अनुभवला आहे अशी माहिती अलीकडेच जाहीर झालेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 (NFHS-5) च्या तपशीलवार आकडेवारीवरून दिसून येते.
हा फरक वयानुसार कमी होतानाही दिसत नाही. २३ ते २४ वयोगटातील ७४.७% मुलींनी लैंगिक अनुभव घेतल्याची कबुली दिली, त्याच वयोगटातील ४५.३% मुलांनी सेक्सचा अनुभव घेतला आहे. लग्नाशिवाय संबंध बनवण्यामध्ये मुले आघाडीवर आहेत. २३ ते २४ वयोगटातील अविवाहित मुलींपैकी ९५.३% कधीच संबंध ठेवले नाहीत. तर त्याच वयोगटातील अविवाहित मुलांची संख्या ज्यांनी कधीही संबंध ठेवले नाहीत त्यांची संख्या ७७.२% आहे.
म्हणजेच मुलींचे लग्नाचे सरासरी वय अजूनही मुलांच्या तुलनेत कमी असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. लवकर लग्न केल्यामुळेच १५ ते २४ वयोगटातील मुलींना त्याच वयाच्या मुलांपेक्षा जास्त लैंगिक अनुभव येतो. पत्नीच्या मारहाणीच्या मुद्द्यावर विचारात नक्कीच बदल झाला आहे, पण परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. पतीने पत्नीला मारहाण करणे योग्य आहे, असे देशातील ४५ टक्के महिलांचे मत आहे. NFHS-4 च्या तुलनेत हा आकडा ७% ने घसरला आहे, पण तो कमी नाही. त्याच वेळी ४४% पुरुष असेही मानतात की पत्नीला मारहाण योग्य आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे NFHS-4 च्या तुलनेत हा आकडा २% ने वाढला आहे.
मुस्लीम समाजात मुलींचे कमी वयात लग्न करण्याचा ट्रेंड सर्वाधिक आहे. त्यानंतर हिंदू समाजाचा नंबर लागतो. NFHS-5 डेटानुसार, मुस्लिम समुदायामध्ये १५ ते २४ वयोगटातील मुलींमध्ये लैंगिक संबंधाचे अनुभव जास्त दिसून येतात. या समाजात कमी वयात लग्न करण्याचा ट्रेंड जास्त आहे. १५ वर्षापूर्वी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या मुलींची संख्याही या समुदायात सर्वाधिक आहे. जैन समाजात कमी प्रमाणात दिसून येते.
सर्वेक्षणादरम्यान पतीने पत्नीला मारहाण केल्याची ७ कारणे सांगितली. ही होती कारणे-
पत्नी पतीला न सांगता घराबाहेर पडली.
बायको घर आणि मुलांची काळजी घेत नाही.
पत्नी पतीशी वाद घालते.
पत्नी पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देते.
बायको नीट स्वयंपाक करत नाही.
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय.
पत्नी सासू, सासरे यांचा अपमान करते.