पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क करायचाय?; मग जाणून घ्या फोन नंबर, पत्ता अन् बरंच काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 05:28 PM2021-02-03T17:28:39+5:302021-02-03T17:31:26+5:30
PM Narendra Modi : जर तुम्हालाही पीएमचा फोन नंबर, ईमेल आयडी किंवा अन्य पद्धतीने संपर्क करायचा असेल तर तो कसा करायचा हे जाणून घेऊया...
नवी दिल्ली - लोकसभेतील चर्चेदरम्यान खासदारांच्या मदतीसाठी 24/7 हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मात्र सध्या या हेल्पलाईनवर खासदारांपेक्षा सर्वसामान्यांकडून अधिक फोन येत आहेत. हेल्पलाईनवर फोन करताना अनेक जण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन नंबर मागत आहेत. अनेकांना मोदींना भेटायचे आहे. तर काहींना सूचना करायच्या आहेत. जर तुम्हालाही पीएमचा फोन नंबर, ईमेल आयडी किंवा अन्य पद्धतीने संपर्क करायचा असेल तर तो कसा करायचा हे जाणून घेऊया...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचण्याची सर्वात साधी सोपी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. तुम्ही मोदींच्या अधिकृत अकाउंटवरून तुमच्या भावना पोहोचवू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया अकाउंट्स
www.facebook.com/narendramodi
twitter.com/narendramodi
https://plus.google.com/+NarendraModi,
https://www.youtube.com/user/narendramodi
https://www.instagram.com/narendramodi
https://www.mygov.in/home/61/discuss/
या ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार, शुभेच्छा आणि सूचना पाठवू शकतात. तसेच तुम्ही डिबेटमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच नरेंद मोदी अॅप (नमो अॅप) वरूनही तुम्ही कनेक्ट होऊ शकतात.
ईमेल द्वारे तुम्ही पीएमपर्यंत पोहोचू शकतात. यासाठी पंतप्रधान कार्यालयाला connect@mygov.nic.in वर मेल करू शकता किंवा narendramodi1234@gmail.com वर ईमेल पाठवू शकता. जर तुम्हाला वरील सर्व प्रकारात काही अडचण येत असेल तर तुम्ही पीएम यांना पत्र लिहू शकता. वेब इनफॉर्मेशन मॅनेजर, साउथ ब्लॉक, रायसीना हिल्स, नवी दिल्ली, पिन 110011. या पत्त्यावर पत्र पाठवू शकता. जर तुम्हाला फोन नंबर किंवा फॅक्स करायचा असेल तर 011-23015603, 11-23018939, 011-23018668 वर फोन करू शकता किंवा +91-11-23019545 या 23016857 वर फॅक्स करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी रस्त्यावर करताहेत आंदोलन"https://t.co/CNu7gM7ALe#Congress#ModiGovt#FarmersProtest#Budget2021pic.twitter.com/Ofe7P0jUFO
— Lokmat (@MiLOKMAT) February 2, 2021