क्या कहूँ, हैरान हूँ, शर्मसार हूँ - योगेंद्र यादवांचे हताश उद्गार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 08:46 PM2018-01-03T20:46:55+5:302018-01-03T20:53:05+5:30

राज्यसभेच्या तीन जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांत आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांमुळे आम आदमी पक्षावर पक्षाचे आजी माजी कार्यकर्ते, नेते टीका करत आहेत. 

What to say, I am shocked, shameful - Yogendra Yadav's desperate exclamation | क्या कहूँ, हैरान हूँ, शर्मसार हूँ - योगेंद्र यादवांचे हताश उद्गार 

क्या कहूँ, हैरान हूँ, शर्मसार हूँ - योगेंद्र यादवांचे हताश उद्गार 

googlenewsNext

नवी दिल्ली- राज्यसभेच्या तीन जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांत आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांमुळे आम आदमी पक्षावर पक्षाचे आजी माजी कार्यकर्ते, नेते टीका करत आहेत. आपने संजय सिंह यांंच्याबरोबर एन. डी. गुप्ता आणि सुशील गुप्ता यांची उमेदवारीसाठी निवड केली आहे.

कुमार विश्वास यांनी उपरोधिक शैलीत केजरीवाल आणि त्यांच्या टीमवर टीका केली तर ट्विटरवर आपचे माजी नेते आणि मार्गदर्शक प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. तसेच मयांक गांधी यांनीही आप आणि बसपामध्ये काहीच फरक राहिलेला नाही, अशा हताश भावना व्यक्त करणारे ट्विट केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये योगेंद्र यादव म्हणतात, "अरविंदचे कितीही दोष असतील पण त्याला कोणीही विकत घेऊ शकत नाही, असं गेल्या तीन वर्षांपासून मी अनेकांना सांगितलंय, म्हणूनच मी कपिल शर्मा यांनी केलेले आरोप फेटाळले, पण आज काय बोलायचं तेच कळत नाही, मी हैराण झालोय, मलाच लाज वाटू लागली आहे."


यादव यांच्याबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ आणि आपचे माजी नेते प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटमधून आपने राज्यसभेसाठी निवड केलेल्या उमेदवारांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ज्या लोकांनी सार्वजनिक जीवनाशी फारकत घेतलेली नाही अशांची निवड आपने केली आहे, तसेच राज्यसभेत जावे असा कोणताही अनुभव त्यांना नाही. आपने कार्यकर्त्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष केले आहे, अशा शब्दांमध्ये प्रशांत भूषण यांनी आपवर फटकारे ओढले आहेत.
मयांक गांधी ट्विटमध्ये म्हणतात, " सुशील गुप्तांची राज्यसभेसाठी का निवड केली असावी ? आप आणि बसपामध्ये काहीही फरक राहिलेला नाही, आप हा भ्रष्ट पक्ष झाला आहे यात शंका नाही. जातीयवाद आणि जातींच्या व्होटबँकेनंतर आपण भ्रष्टाचाराचा शेवटचा बालेकिल्लाही सर केला आहे."
या सगळ्या नेत्यांनी आपवर तोंडसुख घेतल्यावर पक्षाचे माजी सदस्य कपिल मिश्रा स्वस्थ बसते तरच नवल. त्यांनीही उपरोधिक ट्विट करून आपच्या निर्णयावर जबरदस्त टीका केली आहे. सुशील गुप्तांचे वर्णन त्यांनी " केजरीवाल प्रमाणित, महान समाजसेवी" असे करून गुप्ता यांचे एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.

 

Web Title: What to say, I am shocked, shameful - Yogendra Yadav's desperate exclamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.