नगर पंचायत निकालांवर भाजपाचे मौन का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 04:20 AM2017-12-05T04:20:31+5:302017-12-05T04:20:47+5:30
उत्तर प्रदेशात १६पैकी १४ जागांवर भाजपाचे महापौर निवडून आल्यानंतर भाजपाकडून हे मोठे यश असल्याचे सांगितले जात असले तरी, नगर पंचायतीची आकडेवारी वेगळीच वस्तुस्थिती दाखवत आहे..
इटा : उत्तर प्रदेशात १६पैकी १४ जागांवर भाजपाचे महापौर निवडून आल्यानंतर भाजपाकडून हे मोठे यश असल्याचे सांगितले जात असले तरी, नगर पंचायतीची आकडेवारी वेगळीच वस्तुस्थिती दाखवत आहे. ग्रामीण भागांत म्हणजेच नगर पंचायतच्या ५,४३३ जागांपैकी भाजपाला फक्त ६६४ जागा मिळाल्या आहेत. याबाबत भाजपा मौन बाळगून का आहे, असा सवाल माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे.
या निवडणुकीत भाजपाने महापौरपदाच्या निवडीत मोठे यश मिळविले आहे. पण, नगर पंचायत निकालांची वस्तुस्थिती त्याहून खूपच वेगळी आहे. नगर पंचायतीच्या एकूण ५,४३३ जागांपैकी ३,८७५ जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. भाजपाला केवळ ६६४ जागा मिळाल्या आहेत. तर, नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्षांनी ३,३८० वॉर्डमध्ये विजय मिळविला आहे आणि भाजपाला ९९२ वॉर्डांतच विजय मिळाला आहे.