धर्माच्या नावाखाली लोकांना घाबरवणं म्हणजे दहशतवाद नव्हे तर काय ?, अभिनेते प्रकाश राज यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 08:25 PM2017-11-03T20:25:04+5:302017-11-03T20:39:55+5:30

नवी दिल्ली- कमल हासनपाठोपाठ अभिनेते प्रकाश राज यांनीही हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावरून भाजपा व हिंदू संघटनांवर टीकेची झोड उठवली आहे.

What is terrorism, not terrorism, in the name of religion ?, the question of actor Prakash Raj | धर्माच्या नावाखाली लोकांना घाबरवणं म्हणजे दहशतवाद नव्हे तर काय ?, अभिनेते प्रकाश राज यांचा सवाल

धर्माच्या नावाखाली लोकांना घाबरवणं म्हणजे दहशतवाद नव्हे तर काय ?, अभिनेते प्रकाश राज यांचा सवाल

Next

नवी दिल्ली- कमल हासनपाठोपाठ अभिनेते प्रकाश राज यांनीही हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावरून भाजपा व हिंदू संघटनांवर टीकेची झोड उठवली आहे. धर्म, संस्कृती, नैतिकतेच्या नावाखाली भीती निर्माण करणं म्हणजे दहशतवाद नव्हे, तर काय आहे ?, असा सवाल ट्विट करत प्रकाश राज यांनी उपस्थित केला आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतरही प्रकाश राज यांनी थेट नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केलं होतं. ट्विट करत ते म्हणाले, भारतात रस्त्यावरून चाललेल्या प्रेमी युगुलासोबत नैतिकतेच्या नावाखाली छेडछाड करणे, तसेच त्यांना धक्काबुक्की करणे हे दहशतवाद नव्हे, तर काय ?, गोहत्येच्या फक्त संशयावरून लोकांना जिवानिशी मारणे हा दहशतवाद नव्हे, तर काय आहे, असाही प्रश्नही त्यांनी विचारला आहे. जरी विरोधी सूर येत असल्यास त्या व्यक्तीला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देणे दहशतवाद नसल्यास दहशतवादाची नेमकी व्याख्या कोणती ?, असंही ते म्हणाले आहेत.



 

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनयानंतर आता राजकारणात प्रवेश करत असलेल्या कमल हासन यांनी ‘हिंदू दहशतवादा’वरून नवा वाद छेडला आहे. भा.दं.वी. कलम 500, 511, 298,295(अ) आणि 505(क) नुसार कमल हासन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला असल्याची टीका त्यांनी तामिळ साप्ताहिक ‘आनंदा विकटन’मध्ये लिहिलेल्या लेखातून केली. 

नेमकं काय आहे लेखात -

हिंदू दहशतवादावर भाष्य करणारा लेख लिहून कमल हासन यांनी खळबळ उडवून दिली आहे. 'उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे', असा आरोप कमल हासन यांनी त्यांच्या लेखातून केला आहे. 'हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, असं कोणीच म्हणणार नाही. यापूर्वी हिंदुत्ववादी चर्चा करण्यावर विश्वास ठेवायचे. पण आता ते हिंसाचारातही सहभागी होऊ लागले आहेत', असं कमल हासन यांनी म्हंटलं आहे. तसंच जनतेचा 'सत्यमेव जयते'वरील विश्वास उडाला आहे, असंही त्यांनी लेखात म्हंटलं आहे. 'तामिळनाडूच्या तुलनेत केरळ सरकारने धार्मिक हिंसाचार चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे', असं म्हणत कमल हासन त्यांनी केरळ सरकारचं कौतुकही केलं आहे.

कमल हासन मानसिकदृष्टया अस्थिर, उपचारांची गरज- भाजपानं केली टीका

कमल हासन यांचे विधान भाजपा नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यांनी अत्यंत बोच-या शब्दात कमल हासन यांच्यावर टीका केली आहे. कमल हासन यांची मनोवस्था ठीक नसून, ते मानसिक दृष्टया अस्थिर झाले आहेत अशा शब्दात भाजपा नेत्यांनी कमल हासन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कमल हासन यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली पाहिजे. त्यांची मनोवस्था ठीक नसून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्याची गरज आहे असे भाजपा नेते विनय कटियार म्हणाले. अशा प्रकारचे एखाद्याची बदनामी करणारे राजकारण करणे अजिबात योग्य नाही. त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाहीय असे कटियार यांनी सांगितले.  

Web Title: What is terrorism, not terrorism, in the name of religion ?, the question of actor Prakash Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.