सर्जिकल स्ट्राइकचा परिणाम काय होईल?

By admin | Published: September 29, 2016 04:56 PM2016-09-29T16:56:07+5:302016-09-29T16:58:49+5:30

सर्जीकल स्ट्राईक म्हणजे शत्रु विरोधात केलेली प्रतिकारवाई होय. शत्रुचा नायनाट करण्यासाठी ही कारवाई केली जाते भारताने केलली सर्जीकल स्ट्राईक ही पाकिस्तान विरोधातील कृती नाही

What will be the consequences of a surgical strike? | सर्जिकल स्ट्राइकचा परिणाम काय होईल?

सर्जिकल स्ट्राइकचा परिणाम काय होईल?

Next

- विजय खरे

सर्जीकल स्ट्राईक म्हणजे शत्रु विरोधात केलेली प्रतिकारवाई होय. शत्रुचा नायनाट करण्यासाठी ही कारवाई केली जाते भारताने केलली सर्जीकल स्ट्राईक ही पाकिस्तान विरोधातील कृती नाही. ही कारवाई दहशतवादाच्या विरोधातील आहे. हे आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे.
युद्धाची शक्यता नाही :
अर्थातच या कारवाईचे दूरगामी परिणामही लक्षात घ्यायला हवेत. हा कमी तीव्रतेचा संघर्ष असून दोन्ही देशांना युद्धाच्या जवळ नेणारा आहे. परंतू आजची भूराजकीय, भूसामरिक तसेच आंतराष्ट्रीय परिस्थीती पाहता दोन्ही देशात युद्ध होणे शक्य नाही. या सारख्या कारवाया भारताने या याधीही केलेल्या आहेत. अमेरिकेनेही दहशदवाद्यांविरोधात पाकिस्तानात या प्रकारच्या कारवाया केल्या आहेत. दहशदवाद्यांवर नियंत्रण हाच अशा कारवायांचा हेतू असतो. त्यामुळे पाकिस्तान जरी बाबत ओरडत असला तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची नाकेबंदी केलेली आहे.
दहशतवादाला वचक
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारतात दहशदवादी हल्ले झाले. एका लोकशाही देशावर होणारे हल्ले ही निंदनीय बाब होती. यामुळे या प्रकरच्या कारवाई करण्यात यावी अशी सर्व सामान्यांचीही भावना होती. त्यामुळे याचे स्वागत होईल. पण अशा कारवाईमुळे दहशदवादाचा बिमोड किंवा समुळ उच्चाटन होईल असे नाही. दहशदवादाला विविध पैलु आहेत. त्यांचा समुळ उच्चाटन होणे शक्य नाही. मात्र, या कारवायांमुळे त्यांच्यावर वचक नक्कीच बसेल.


( लेखक यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय संस्था आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण विश्लेषण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संचालक आहेत.)

Web Title: What will be the consequences of a surgical strike?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.