३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या सर्व नोटा बँकेत न अल्यास काय करणार? RBIकडे आहे हा एकमेव मार्ग   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 02:31 PM2023-05-23T14:31:07+5:302023-05-23T14:31:48+5:30

2000 Rupees Notes: ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या सर्व नोटा बँकांकडे आल्या नाहीत तर रिझर्व्ह बँक कोणतं पाऊल उचलणार, असा प्रश्न पडलेला आहे.

What will be done if all the notes of 2000 are not in the bank by September 30? This is the only way with RBI | ३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या सर्व नोटा बँकेत न अल्यास काय करणार? RBIकडे आहे हा एकमेव मार्ग   

३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या सर्व नोटा बँकेत न अल्यास काय करणार? RBIकडे आहे हा एकमेव मार्ग   

googlenewsNext

दोन हजार रुपयांती नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. या घोषणेनंतर ही नोट अवैध घोषित केली जाणार का हा प्रश्नही लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे. आतापर्यंत आरबीआयने अशी कुठलीही घोषणा केलेली नाही. मात्र आरबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या सर्व नोटा बँकांकडे आल्या नाहीत तर रिझर्व्ह बँक कठोर पाऊल उचलू शकते. समोर येत असलेल्या माहितीनुसार जर सर्व नोटा परत बँकेत आल्या तर त्याला अवैध चलन घोषित करण्याची गरज भासणार नाही.

मात्र रिझर्व्ह बँकेने जेवढ्या नोटा परत येण्याबाबतचा अंदाज बांधला आहे, त्यापेक्षा खूप कमी नोटा बँकेत परत आल्या तर सक्त पाऊल उचलण्याचा विचार रिझर्व्ह बँकेकडून केला जाईल. सध्यातरी २ हजार रुपयांची नोट वैध चलन असेल. परदेशात राहणारे लोक आणि ज्यांना खरोखरच अडीअडचण आहे. त्यांना नोटा बदलून घेता याव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात आरबीआयने सांगितले होते की, दोन हजार रुपयांच्या ज्या नोटा व्यवहारात आहेत त्यांचं एकूण मूल्य हे ३.६२ लाख कोटी रुपये एवढं आहे. बाजारात असलेल्या सध्याच्या चलनामध्ये त्याचा वाटा केवळ १०.८ टक्के एवढाच आहे. तर सुमारे ५ वर्षांपूर्वी ३१ मार्च २०१८ रोजी दोन हजार रुपयांच्या चलनात असलेल्या नोटांचं मूल्य हे ६.७३ लाख कोटी रुपये एवढं होतं. तेव्हा चलनामध्ये असलेल्या एकूण नोटांमध्ये त्यांचा वाटा हा ३० टक्के एवढा होता.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लोकांना आवाहन केलं की, बँकांमध्ये नोटा जमा करण्यासाठी गर्दी करण्याची गरज नाही. तुम्ही हळूहळू नोटा बदलून घेऊ शकता. एका दिवसात दोन हजार रुपयांच्या केवळ १० नोटा बदलता येतील. त्यासाठी सर्वसामान्यांकडे चार महिन्यांचा वेळ आहे. एका दिवसामध्ये १० हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलण्यासाठी कुठलाही फॉर्म भरण्याची गरज नाही. २०१६ मध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर रोख रकमेची टंचाई कमी करण्यासाठी दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. आता आरबीआयने क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत ही नोट चलनातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.  

Web Title: What will be done if all the notes of 2000 are not in the bank by September 30? This is the only way with RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.