मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या NDA सरकारमध्ये काय असेल अमित शाह यांची भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 11:04 AM2024-06-09T11:04:02+5:302024-06-09T11:04:48+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तिसऱ्या सरकारमध्ये काय भूमिका असेल याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

What will be the role of Amit Shah in new NDA government led by Narendra Modi after Lok Sabha Election Result 2024 | मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या NDA सरकारमध्ये काय असेल अमित शाह यांची भूमिका?

मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या NDA सरकारमध्ये काय असेल अमित शाह यांची भूमिका?

Amit Shah role in Modi 3.0 : लोकसभा निवडणुकीच्या २०२४च्या निकालावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. विजय-पराजयानंतर आता नवीन सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू आहे. पुढचे सरकार NDAचे बनणार आहे. गेल्या दोन सरकारांमध्ये भाजपाचा वरचष्मा होता, पण यावेळी भाजपला NDA तील घटक पक्षांना एकत्रित करण्यात येणार आहे. बुधवारी दिल्लीत एनडीएची बैठक झाली आणि या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. २०१९ पेक्षा २०२४ चे चित्र वेगळे आहेत. अशा वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तिसऱ्या सरकारमध्ये काय भूमिका असेल याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

बुधवारी एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीत समोर आलेल्या फोटोच चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधान मोदींच्या शेजारी आणि नितीश कुमार त्यांच्या शेजारी उभे असल्याचे दिसले. यानंतर एनडीएचे इतर मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेदेखील दिसले. चिराग पासवान, अनुप्रिया पटेल आणि एनडीएचे इतर सहकारी नेतेदेखील फोटोत ठळकपणे दिसून आले. तर दुसरीकडे भाजपचे तीन नेते मोदींच्या जवळ उभे असल्याचे दिसले. त्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, त्यानंतर राजनाथ सिंह आणि त्यानंतर अमित शहा यांचा नंबर होता. गेल्या टर्ममध्ये अमित शाह नरेंद्र मोदींच्या शेजारीच दिसत होते. पण यावेळी मोदींच्या शेजारी घटक पक्षातील नेतेमंडळी दिसत असल्याने याचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत.

शाह-मोदी अंतर वाढणार?

२०१९ मधील फोटोत भाजपाला बहुमत मिळाले होते. त्यावेळी एनडीएचे अनेक नेतेमंडळी फोटोत होते. पण सध्या त्यातील काही मंडळी NDA मध्ये नाहीत. उद्धव ठाकरे, अकाली दल हे त्या फोटोत होते आणि त्यात अमित शाह मोदींच्या अगदी शेजारी उभे होते. पण यावेळी, मात्र फोटोत अमित शाह आणि मोदी यांच्यातील अंतर काहीसे वाढलेले दिसते. तसेच अमित शाह हे अतिशय स्पष्टवक्ते आणि रोखठोक भूमिका मांडणारे नेते आहे. गृहमंत्री म्हणून गेल्या पाच वर्षात त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. पण यावेळी NDA तील विविध विचारधारांच्या पक्षांना सोबत घेऊन पुढे जाताना ही तारेवरची कसरत असणार आहे. अशा वेळी रोखठोक भूमिका बजावणाऱ्या नेत्याऐवजी एखाद्या मवाळ स्वभावाच्या नेत्याला मोदी आपल्या जवळ ठेवू शकतात, जेणेकरून घटक पक्षांशी सामंजस्याची वर्तणूक केली जाईल, असाही एक मतप्रवाह राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.

Web Title: What will be the role of Amit Shah in new NDA government led by Narendra Modi after Lok Sabha Election Result 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.