शाह गृहमंत्री झाल्यानंतर भक्त विचारतात, तुझ काय होणार : हार्दिक पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 04:06 PM2019-06-01T16:06:17+5:302019-06-01T16:16:14+5:30
अमित शहा दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सामील झाले आहेत. याआधी मोदी गुजरातचे पंतप्रधान असताना अमित शाह यांच्याकडे गुजरातचे गृहमंत्रीपद होते.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमधील खातेवाटप झाले आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची गृहमंत्रीपदी वर्णी लागली आहे. यावर काँग्रेसनेते हार्दिक पटेल यांनी शाह यांचे अभिनंदन केले. तसेच आपल्याला धमक्या मिळत असल्याची तक्रार ट्विटवर केली.
हार्दिक यांनी ट्विटमध्ये म्हटले की, अमित शाह यांचे गृहमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन. मात्र अमित शाह गृहमंत्री झाल्यानंतर काही भक्त विचारत आहेत की, तुमच्यासारख्या भाजपविरोधी लोकांच काय होणार, असंही हार्दिकने म्हटले आहे. तसेच अमित शाह गृहमंत्री झाल्यानंतर सर्वाधिक आनंद भक्तांना झाल्याचे सांगताना भाजपविरुद्ध लढणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना ठार कऱण्यात येणार का ? असा सवाल हार्दिक यांनी विचारला. तसं असेल तर त्यातही देवाची इच्छा असं म्हटले.
अमित शाह जी गृह मंत्री बने हैं इसलिए मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूं।लेकिन आज कुछ भक्तों के मुझ पर मैसेज आए कि अब तेरा क्या होगा हार्दिक।मतलब अमित शाह के गृह मंत्री बनने के बाद भक्त काफी खुश हैं।भाजपा के खिलाफ लड़ने वाले हम जैसे युवा को मार दिया जाएगा ? चलों जैसी भगवान की इच्छा !
— Hardik Patel (@HardikPatel_) May 31, 2019
अमित शहा दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सामील झाले आहेत. याआधी मोदी गुजरातचे पंतप्रधान असताना अमित शाह यांच्याकडे गुजरातचे गृहमंत्रीपद होते. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांना केंद्रीय गृहमंत्री बनविण्यात आले आहे.