एनआरसीबाहेरील १९ लाख लोकांचे काय करणार? पी. चिदम्बरम यांचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 01:23 AM2019-10-08T01:23:10+5:302019-10-08T01:23:26+5:30
चिदम्बरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणात ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत.
नवी दिल्ली : एनआरसी (नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन) प्रक्रियेचा परिणाम शेजारी देशावर होणार नाही, असा शब्द मोदी सरकारने बांगलादेशला दिला आहे, तर एनआरसीच्या बाहेर राहणाऱ्या १९ लाख लोकांचे सरकार काय करणार? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी मोदी सरकारला केला आहे.
आयएनएक्स मीडिया प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या वतीने टष्ट्वीट केले आहे की, हे १९ लाख लोक कधीपर्यंत अनिश्चितता, चिंतेत राहणार आहेत आणि मानवी हक्कांपासून वंचित राहणार आहेत? जर एनआरसी कायदेशीर प्रक्रिया आहे, तर कायदेशीर प्रक्रियेनुसार त्या १९ लाख लोकांचे काय होणार ज्यांना अवैध नागरिक घोषित करण्यात आले आहे. जर बांगलादेशला असा विश्वास देण्यात आला आहे की, एनआरसी प्रक्रियेचा परिणाम बांगलादेशवर होणार नाही, तर भारत सरकार १९ लाख लोकांचे काय करणार? आम्ही महात्मा गांधी यांच्या मानवता सिद्धांताचा सोहळा साजरा करीत आहोत. अशावेळी या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. चिदम्बरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणात ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत.