मी अल्लाहला काय उत्तर दिले असते?
By admin | Published: September 16, 2015 01:44 AM2015-09-16T01:44:57+5:302015-09-16T01:44:57+5:30
प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्यावर आधारित ‘मोहंमद : मॅसेंजर आॅफ गॉड’ या इराणी चित्रपटास संगीत देण्याचा निर्णय हा कुणालाही दुखावण्याच्या हेतूने घेतला नव्हता, असे स्पष्टीकरण देत,
नवी दिल्ली : प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्यावर आधारित ‘मोहंमद : मॅसेंजर आॅफ गॉड’ या इराणी चित्रपटास संगीत देण्याचा निर्णय हा कुणालाही दुखावण्याच्या हेतूने घेतला नव्हता, असे स्पष्टीकरण देत, संगीतकार ए.आर. रेहमान यांनी त्यांच्या विरोधात काढलेल्या फतव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
प्रेषित मोहंमद यांचे चित्र रेखाटणे, त्यांची व्यक्तिरेखा साकारणे इस्लाममध्ये निषिद्ध आहे, असे सांगत रझा अकादमीने ए. आर. रेहमान आणि ‘मोहंमद : मॅसेंजर आॅफ गॉड’ या चित्रपटाविरोधात फतवा काढला आहे. फतव्यावर स्पष्टीकरण देणारे पत्रक रेहमानने मंगळवारी फेसबुकवर शेअर केले आहे.‘मोहंमद : मॅसेंजर आॅफ गॉड’ चित्रपटाचा मी निर्माता नाही. मी केवळ संगीत दिले आहे. समाजातील गैरसमज दूर करणे आणि प्रेम, दया, शांती यासह जीवन जगणे असा संदेश देणारा हा चित्रपट नाकारला असता तर अल्लाहला मी काय उत्तर दिले असते, असा भावनिक सवाल रेहमानने केला आहे. हा चित्रपट स्वीकारण्यामागे वाईट हेतू नव्हता.