करदात्यांसाठी बजेटमध्ये काय आहे?

By admin | Published: February 29, 2016 12:51 PM2016-02-29T12:51:50+5:302016-02-29T14:09:01+5:30

या बजेटमध्ये करपात्र उत्पन्नाच्या मर्यादांमध्ये बदल करण्यात आलेला नसून त्या गेल्याच वर्षीप्रमाणे आहेत. मात्र, करदात्यांच्या दृष्टीने करांच्या अंगाने असलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे:

What's in the budget for taxpayers? | करदात्यांसाठी बजेटमध्ये काय आहे?

करदात्यांसाठी बजेटमध्ये काय आहे?

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - या बजेटमध्ये करपात्र उत्पन्नाच्या मर्यादांमध्ये बदल करण्यात आलेला नसून त्या गेल्याच वर्षीप्रमाणे आहेत. मात्र, करदात्यांच्या दृष्टीने करांच्या अंगाने असलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे:
 
- प्रथमच घर खरेदी करत असलेल्यांना 35 लाख रुपयांच्या गृहकर्जावर, घराची किंमत 50 लाख रुपयांपर्यंत असल्यास 50 हजार रुपयांची करवजावट मिळणार.
- वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्यांच्या इन्कम टॅक्सवरील अधिभार 12 टक्क्यांवरून वाढवून 15 टक्के.
- करपात्र उत्पन्नाच्या मर्यादांमध्ये म्हणजेच टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही.
- वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या करदात्यांना दर वर्षाला 3000 रुपयांची कलसवलत. सध्याच्या 2000 रुपयांवरून वाढून ही वजावट 5000 रुपये. याचा फायदा एक कोटी करदात्यांना होणार.
- भाड्याच्या घरात राहत असलेल्यांना भाड्यापोटी मिळणारी वजावट 20 हजार रुपयांवरून वाढवून 60 हजार रुपये करण्यात आली आहे.
 
एका नजरेत बजेटसंदर्भातल्या गेल्या तीन वर्षांच्या महत्त्वाच्या आकडेवारीवर एक नजर
 

Web Title: What's in the budget for taxpayers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.