क्या बात है...  कुटुंबात 5 मुली, 3 IAS-IRS अधिकारी तर 2 इंजिनिअर

By महेश गलांडे | Published: December 12, 2020 04:01 PM2020-12-12T16:01:04+5:302020-12-12T17:13:58+5:30

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांना पहिले कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर, एका पाठोपाठ एक अशा 5 मुली कुटुंबात जन्मास आल्या.

What's the matter ... 3 out of 5 girls in the family have passed UPSC and 2 are engineers in uttar pradesh bareli | क्या बात है...  कुटुंबात 5 मुली, 3 IAS-IRS अधिकारी तर 2 इंजिनिअर

क्या बात है...  कुटुंबात 5 मुली, 3 IAS-IRS अधिकारी तर 2 इंजिनिअर

Next
ठळक मुद्देफरीदपूर तालुक्यातील या कुटुंबात 5 मुलींचा जन्म झाल्यानंतरही आनंद होता. पण, गावातील आणि समाजातील काही लोकांकडून मुलींच्या जन्मामुळे टोमणे मारण्यात येत होते

बरेली - मुलगी नको मुलगा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, अशी धारणा समाजामध्ये आहे. मुलाच्या जन्मासाठी आजही महिलांना दोन पेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा लागतो. स्त्री भ्रूण हत्यासारख्या घटना आजही आपल्या समाजात घडताना दिसत आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील एका कुटुंबांतील मुलींनी मुलीही मुलांपेक्षा कमी नाहीत, मुलीही मुलांप्रमाणेच, त्यांच्यापेक्षाही मोठं यश मिळवू शकतात हे दाखवून दिलंय. येथील एकाच कुटुंबातील 5 मुलींपैकी 2 आयएएस अधिकारी व 1 मुलगी आयआरएस अधिकारी आहेत. तर, उर्वरीत दोन मुली इंजिनिअर बनून नोकरी करत आहेत. 

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांना पहिले कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर, एका पाठोपाठ एक अशा 5 मुली कुटुंबात जन्मास आल्या. फरीदपूर तालुक्यातील या कुटुंबात 5 मुलींचा जन्म झाल्यानंतरही आनंद होता. पण, गावातील आणि समाजातील काही लोकांकडून मुलींच्या जन्मामुळे टोमणे मारण्यात येत होते. 5 मुली झाल्यामुळे समाज व नातेवाईकांकडून खासगीत बोलताना, काय मुलींना आयएएस बनवणार आहात का? असंही बोललं जात. मात्र, कुटुंबीयांनी मुलींना उच्च शिक्षण देत ते खरं करुन दाखवलं. चंद्रसेन यांच्या 5 पैकी तीन मुलींनी युपीएससी परीक्षा पास केली आहे. 

चंद्रसेन सागर यांच्या 5 मुलींपैकी 3 मुलींनी युपीएससी परीक्षा पास केली असून दोन मुली आयएएस अधिकारी आहेत. तर, तिसरी मुलगी आयआरएस अधिकारी आहे. विशेष म्हणजे इतर दोन मुलींनीही इंजिनिअरची पदवी घेतली असून त्याही इंजिनिअर बनल्या आहेत. मुलींच्या आयएएस बनण्यात मुलींनी घेतलेल्या कष्टाचे आणि तिच्या आईने दिलेल्या काबाडकष्टाचं मोठं योगदान असल्याचं वडिल चंद्रसेन सागर यांनी म्हटलं. 

चंद्रसेन यांच्या मुलींच्या शिक्षणाची सुरुवात बरेली येथील सेंट मारिय कॉलेजमधून झाली. त्यानंतर, उत्तराखंड, इलाहाबाद आणि दिल्ली येथे जाऊन पुढील उच्च शिक्षण घेतले. तिन्ही बहिणींनी दिल्लीत राहून आपलं युपीएससी स्पर्धा परिक्षेचं शिक्षण घेतलं. चंद्रसेन यांची पहिली मुलगी अर्जित 2009 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर, मुंबईतील जॉईंट कमिश्नर कस्टम कार्यालयात रुजू झाली. अर्जित यांचे लग्न आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झाली असून तिचे पतीही आयएएस अधिकारी आहेत. 6 वर्षानंतर म्हणजेच 2015 मध्ये चंद्रसेन यांच्या दुसऱ्या मुलीनेही आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. अर्पित असं तिचे नाव असून त्या सध्या वालसाड येथे डीडीओ पदावर कार्यरत आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या नंबरच्या दोन्ही मुली इंजिनिअर असून त्या मुंबई आणि दिल्लीत जॉब करत आहेत. 

चंद्रसेन आणि मीना यांच्या 5 व्या नंबरच्या मुलीनेही युपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. आकृतीने 2016 साली दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा पास केली. सध्या ती पाणी महामंडळाच्या संचालपदी रुजू आहेत. चंद्रसेन यांच्या मुलींना त्यांच्या मामापासूनच युपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे मामा अनिल कुमार हे 1995 सालच्या युपीएससी परीक्षेतून आयपीएस अधिकारी बनले होते. त्यामुळे, आपणही आपल्या मामाप्रमाणेच मोठं अधिकारी व्हायचं असं स्वप्न या मुलींनी पाहिलं होतं. मामा अनिल कुमार यांनीही आपल्या भाच्चींना मदत आणि मार्गदर्शन केले, त्यामुळेच मुलींनीही आई-वडिलांचं आणि त्यांचं स्वप्न सत्यात उतरवून दाखवलं. 
 

Web Title: What's the matter ... 3 out of 5 girls in the family have passed UPSC and 2 are engineers in uttar pradesh bareli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.