रेल्वेस्थानकांच्या फलकावर समुद्रसपाटीपासून उंची का लिहिलेली असते?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 11:51 AM2018-07-26T11:51:53+5:302018-07-26T11:53:09+5:30

समुद्रसतहसे 500 मीटर उपर किंवा 500 एमएसएल असे तेथे लिहिलेले आपण अनेकदा पाहिलेले असते. ही उंची संबंधित स्थानकानुसार बदलत असते.

What's the meaning of MSL in railway station? | रेल्वेस्थानकांच्या फलकावर समुद्रसपाटीपासून उंची का लिहिलेली असते?

रेल्वेस्थानकांच्या फलकावर समुद्रसपाटीपासून उंची का लिहिलेली असते?

Next

मुंबई- रेल्वेच्या प्रवासात तुम्ही प्रत्येक स्थानकाच्या दोन्ही बाजूस पिवळे फलक पाहिले असतील. त्यामध्ये साधारणतः तीन लिप्यांमध्ये त्या स्थानकाचे नाव लिहिलेले असते. ते स्थानक ज्या राज्यात आहे तेथील भाषेच्या लिपीमध्ये, देवनागरी म्हणजे हिंदीसाठी वापरली जाणारी लिपी आणि रोमन म्हणजे इंग्रजीसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीमध्ये त्या स्थानकाचे नाव लिहिलेले असते. त्याचप्रमाणे तेथे त्या स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते.

समुद्रसतहसे 500 मीटर उपर किंवा 500 एमएसएल असे तेथे लिहिलेले आपण अनेकदा पाहिलेले असते. ही उंची संबंधित स्थानकानुसार बदलत असते. भारतामध्ये रेल्वे सुरु होऊन दिडशे वर्षे उलटली आहेत. त्याकाळामध्ये स्थानकांचे काम करताना त्यांची समुद्रसपाटीपासून उंची मोजलेली असे. ही उंची नमूद करुन ठेवल्यामुळे रेल्वेरुळ टाकताना त्याचा उपयोग रेल्वेखात्याला होत असे. उंची समजल्यामुळे पावसाळ्यात ते पाण्याखाली जातील का? पूर आल्यास ते पाण्याखाली जातील का? तसेच समुद्राजवळील रेल्वेमार्गावर पाणी येईल का याचा अंदाज खात्याला येत. 

कालांतराने नव्या स्थानकांच्या फलकांवर अशी उंची लिहिणं बंद झाले आहे. परंतु त्याचा अपयोग खात्याच्या अंतर्गत कामांसाठी केला जातो. आजही या उंचीचा उपयोग खात्याला होतो.
उदाहरणार्थ एखादे स्थानक 300 मीटर उंचीवर असेल आणि त्यापुढचे स्थानक 500 मीटर उंचीवर असेल तर दोन्ही स्थानकांमध्ये रुळ टाकताना आपल्याला आधीच्या स्थानकापेक्षा उंचावर रुळ टाकायचे आहेत याचा अंदाज रेल्वेला येतो. त्याचप्रमाणे नव्या रुळांवर येणारी वळणे किंवा तेथिल प्रदेशानुसार आखणी करण्याबाबत नियोजन करता येते.

Web Title: What's the meaning of MSL in railway station?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे