व्हॉटस अॅपनेही दिली 'टॅग' करायची सोय
By admin | Published: September 20, 2016 12:22 PM2016-09-20T12:22:14+5:302016-09-20T12:39:44+5:30
फेसबूक आणि ट्विटरप्रमाणेच आता व्हॉटस अॅपवरही टॅग करायची सोय उपलब्ध झाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - आजच्या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात 'इन्स्टंट मेसेजिंग' अॅप्समध्ये लोकप्रिय असलेल्या 'व्हॉटस अॅप'वर एक नव्या फीचरचा समावेश झाला आहे. फेसबूक आणि ट्विटरप्रमाणेच आता व्हॉटस अॅपनेही टॅग करायची सोय उपलब्ध करून दिली आहे.
त्यामुळे युझर्ससाठी व्हॉट्स अॅपचा वापर अधिक सुलभ झाला आहे. या नव्या फीचरनुसार, ' तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये चॅटिंग करताना कीपॅडवरील '@' हे बटण वापरल्यास ग्रुपवरील सर्व सदस्यांची नावे (contacts) तुम्हाला एकाच वेळी दिसू शकतील. त्यामुळे फेसबूक वा ट्विटरसारखं तुम्ही व्हॉट्स अॅपवरही ग्रुप चॅटमध्ये एक वा अनेक सदस्यांना टॅग करून संदेश देऊ शकता.
मात्र या फीचरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉटस अॅप अपडेट करून घ्यावे लागेल.