वॉट्स अॅपवर मिळणार फ्री कॉलिंगची सुविधा?
By admin | Published: September 1, 2014 06:06 PM2014-09-01T18:06:52+5:302014-09-01T18:06:52+5:30
जवळपास प्रत्येक मोबाईलधारकाचे संवादाचे माध्यम बनलेले व्हॉट्स अॅप लवकरच मोबाईलवरून मोफत कॉल करण्याची सुविधा देणार असल्याचे वृत्त आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - जवळपास प्रत्येक मोबाईलधारकाचे संवादाचे माध्यम बनलेले व्हॉट्स अॅप लवकरच मोबाईलवरून मोफत कॉल करण्याची सुविधा देणार असल्याचे वृत्त आहे. सध्या जगभरात व्हॉट्स अॅपचे ६० कोटी युजर्स असून ही सेवा दिल्यास या अॅपची लोकप्रियता प्रचंड वाढेल हे उघड आहे. भारतातच वॉट्सअॅपचे ५ कोटींहून अधिक युजर्स आहेत. वॉट्सअप ही फ्री मेसेजची सुविधा देणारी कंपनी काही दिवसांपूर्वीच फेसबुकने विकत घेतली होती. जर फ्रि कॉलिंगची सुविधा जर वॉट्सअपवर उपलब्ध असेल तर ती फेसबुकवरही मिळेल अशीही चर्चा आहे.
यासंदर्भात कंपनीचे काही गोपनीय अहवाल फुटल्यामुळे फ्री कॉलिंगच्या बातमीला पाय फुटले असून व्हॉट्स अॅपच्या इंटरफेसमध्ये नुकतेच करण्यात आलेले बदलही नवी सेवा दाखल होणार असल्याचे संकेत देणारे आहेत. फुटलेल्या अहवालांमध्ये व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून आलेला कॉल घेतला तर युजर इंटरफेस कसा असेल हे दाखवणारी छायाचित्रे आहेत. त्यामुळे व्हॉट्स अॅप फ्री कॉलिंगची सुविधा देणार अशी बातमी सध्या रंगलेली आहे.