व्हॉट्सअॅपने 'या' खासदारावर आणली बंदी, गैरवापर टाळण्याचे केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 01:00 PM2019-02-13T13:00:38+5:302019-02-13T13:10:28+5:30
व्हॉट्सअॅपने नुकतेच टीडीपी खासदार सीएम रमेश यांच्यावर बंदी घातली आहे. पण, व्हॉट्सअॅप वापरण्यासंबंधीच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केले नसल्याचे सांगत सीएम रमेश यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.
व्हॉट्सअॅपने नुकतेच टीडीपी खासदार सीएम रमेश यांच्यावर बंदी घातली आहे. पण, व्हॉट्सअॅप वापरण्यासंबंधीच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केले नसल्याचे सांगत सीएम रमेश यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. तसंच, कारवाईसंदर्भात फेसबुकने कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याचंही त्यांनी सांगितले.
दरम्यान, व्हॉट्सअॅपद्वारे फसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूजमुळे देशात कित्येकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. युजर्संना सुरक्षितरित्या व्हॉट्सअॅप हाताळता यावे, यासाठी कंपनीने नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. सोबत अॅपचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईदेखील केली आहे. चुकीच्या कामांसाठी व्हॉट्सअॅपचा वापर करणार असाल तर तुमच्यावरही बंदी येऊ शकते, त्यामुळे वेळीच सावध व्हा.
व्हॉट्सअॅप वापरताना 'या' चुका करू नका
1. WhatsAppच्या नियमांचं उल्लंघन
व्हॉट्सअॅपच्या नियम आणि अटींचे उल्लंघन केल्यास तुमच्यावर कंपनीकडून बंदी आणली जाऊ शकते.
2. अश्लील, अपमानकारक आणि धमकीचे मेसेज
व्हॉट्सअॅपवर कायद्याविरोधात प्रक्षोभक, अवैध माहिती पसरवणे, अश्लील, अपमानकारक, धमकी देणारे मेसेज केल्यासही तुमच्यावर बंदी आणली जाऊ शकते.
3. कठोर गुन्ह्यांचा प्रचार करणारे संदेश
असभ्य आणि कठोर गुन्ह्यांचा प्रचार करणाऱ्या Messagesना प्रोत्साहन देऊ नका, जेणेकरुन समाजात वाद निर्माण होतील.
4. बोगस अकाउंट
कोणत्याही व्यक्तीच्या नावे बोगस अकाउंट तयार करुन त्याद्वारे तुम्ही अवैध काम करत असल्यास कारवाई
5. व्हॉट्सअॅपच्या कोडसोबत छेडछाड
व्हॉट्सअॅपच्या कोर कोडमध्ये बदल करणे किंवा त्यासोबत छेडछाड केल्यासही कारवाई केली जाईल.
6. व्हायरस पाठवणे
व्हॉट्सअॅपच्या मदतीनं व्हायरस किंवा Malware Virus फाइल्स किंवा लिंक पाठवणे
7. हॅकिंग किंवा हेरगिरीचा प्रयत्न
व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करणे, किंवा एखाद्या व्यक्तीची हेरगिरी करणे
8. कित्येक युजर्संकडून तुमचे अकाउंट ब्लॉक
जर मोठ्या संख्येने अनेक युजर्संकडून तुम्हाला ब्लॉक करण्यात आले असल्यास व्हॉट्स अॅपकडून तुमचा व्यवहार आणि मेसेज चुकीचे मानले जातील
9. Contentला रिपोर्ट करणे
कोणत्याही Contentला रिपोर्ट करण्याचा पर्याय व्हॉट्सअॅपनं आपल्या युजर्संना दिला आहे. जर प्रचंड प्रमाणात तुमच्या Contentला रिपोर्ट केले गेल्यास तुमच्यावर बंदी आणण्याचा अधिकार व्हॉट्स अॅपला आहे.
10. धार्मिक वाद
कोणत्याही धर्माविरोधात, धर्म स्थळाविरोधात द्वेष, राग निर्माण करणारे मेसेजेस किंवा पोस्ट शेअर करू नका.