व्हॉट्सॲपचे धोरण प्रचाराचे स्टेटस, जनजागृतीला केली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 01:26 AM2021-01-18T01:26:41+5:302021-01-18T07:08:03+5:30

नवी दिल्ली : आपल्या नव्या व्यक्तिगतता धोरणासंदर्भात (प्रायव्हसी पॉलिसी) व्हॉट्सॲपने जनजागृतीला सुरुवात केली आहे. रविवारी असंख्य व्हॉट्सॲप वापरकर्त्यांच्या स्टेटसमध्ये सर्वोच्च ...

WhatsApp's campaign status, public awareness started | व्हॉट्सॲपचे धोरण प्रचाराचे स्टेटस, जनजागृतीला केली सुरुवात

व्हॉट्सॲपचे धोरण प्रचाराचे स्टेटस, जनजागृतीला केली सुरुवात

Next

नवी दिल्ली : आपल्या नव्या व्यक्तिगतता धोरणासंदर्भात (प्रायव्हसी पॉलिसी) व्हॉट्सॲपने जनजागृतीला सुरुवात केली आहे. रविवारी असंख्य व्हॉट्सॲप वापरकर्त्यांच्या स्टेटसमध्ये सर्वोच्च स्थानावर व्हॉट्सॲपचे बोधचिन्ह होते. त्यावर टिचकी मारल्यावर चार प्रकारची छायाचित्रे दिसून येत होती. त्या प्रत्येक छायाचित्राखाली ‘व्यक्तिगततेला प्राधान्य’ या आशयाचे संदेश प्रसारित करण्यात आले आहेत. 

फेसबुक ही पितृक कंपनी असलेल्या व्हॉट्सॲपने अलीकडेच ८ फेब्रुवारीपासून नवीन व्यक्तिगतता धोरण अमलात आणणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातून वापरकर्त्यांच्या डेटाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यावर आक्षेप घेत अनेक वापरकर्त्यांनी व्हॉट्सॲपचा त्याग केला. 

याची गंभीर दखल घेत व्हॉट्सॲपने नव्या धोरणाची अंमलबजावणी १५ मेपर्यंत पुढे ढकलली. या सर्व पार्श्वभूमीवर वापरकर्त्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी रविवारी व्हॉट्सॲपने स्टेटस ठेवले. या स्टेटसवर टिचकी मारल्यानंतर पुढील छायाचित्रे आणि मजकूर निदर्शनास येत होता. या प्रकाराची दिवसभर सगळ्याच युझर्समध्ये चर्चा सुरु 
होती. 

संदेशात काय? -
- पहिल्या छायाचित्रात आम्ही तुमच्या व्यक्तिगततेबाबत  कटिबद्ध आहोत, असा संदेश आहे.
- दुसऱ्या छायाचित्रातील संदेशात व्हॉट्सॲप तुमचे व्यक्तिगत संदेश वाचू शकत नाही, असे म्हटले आहे.
- तुम्ही इतरांना तुमच्या निवासाचे वा प्रवासाचे ठिकाण पाठविले असल्यास ते आम्ही पाहू शकत नाही, असे तिसऱ्या संदेशात स्पष्ट केले आहे.
- तुमचे संपर्क क्रमांक व्हॉट्सॲप फेसबुककडे देत नाही, असा चौथा संदेश सांगतो.

Web Title: WhatsApp's campaign status, public awareness started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.