व्हॉट्सअॅपच्या चॅटिंगमुळे सिद्ध झाला बलात्काराचा गुन्हा
By admin | Published: June 6, 2017 08:12 PM2017-06-06T20:12:44+5:302017-06-06T20:23:25+5:30
बलात्कार पीडित मुलगी आणि सामुहिक बलात्कार करणाऱ्या तिघांमध्ये व्हॉटसअॅपवर झालेल्या सविस्तर चर्चेचा पुरावा ग्राह्य धरत हरयाणामधील न्यायालयाने तीन विद्यार्थ्यांना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
सोनीपत, दि.6- बलात्कार पीडित मुलगी आणि सामुहिक बलात्कार करणाऱ्या तिघांमध्ये व्हॉटसअॅपवर झालेल्या सविस्तर चर्चेचा पुरावा ग्राह्य धरत हरयाणामधील न्यायालयाने तीन विद्यार्थ्यांना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यामधील प्रमुख आरोपी हार्दिक सिक्री आणि त्याचा मित्र करण छाब्रा यांना ब्लॅकमेलिंग आणि बलात्काराच्या गुन्ह्याच्या आरोपाखाली 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे सर्व विद्यार्थी हरियाणातील ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत. एप्रिल 2015 पासून हे विद्यार्थी दिल्ली येथील कारागृहात आहेत.
एप्रिल 2015 मध्ये पीडित मुलीने हे तीन विधी शाखेच्या तृतीय वर्गाचे विद्यार्थी आपल्यावर वारंवार बलात्कार करत असल्याची तक्रार केली होती. या मुलीची नग्न छायाचित्रे हार्दिक याने आपल्या मित्रांमध्ये फ्री मेसेंजर सर्विसद्वारे प्रसारित केली तसेच अॅपल1 क्लाऊड या वेब स्टोरेज प्लॅटफॉर्मवर ठेवून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्याची धमकी दिली.शिक्षा ठोठावताना न्यायाधिशांनी अश्लील मजकूर प्रसारीत केल्याबद्दलही या आरोपींना दोषी ठरवले.
"मजकूर इतका वाईट आणि अश्लील आहे की, त्याचा निकालपत्रातही समावेश करता येत नाही, त्यातचप्रमाणे या मजकुरातून या मुलीवर त्या तिघांनी पूर्णपणे ताबा मिळवला असल्याचे स्पष्ट होते" असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनिता ग्रोव्हर यांनी शिक्षा सुनावताना स्पष्ट केले."नग्न छायाचित्रांसाठी हार्दिकने तिच्यावर सतत दबाव आणल्याचे या व्हॉटसअॅप चॅटमधून दिसून येते त्याचप्रमाणे स्काईपवरही तिला पाहण्यासाठी त्याने तिला सेक्स टॉयही खरेदी करायला लावल्याचे दिसते" असे न्यायाधिशांनी निकालपत्र वाचताना सांगितले. या इलेक्ट्रॉनिक डेटामधून सिक्रीने पीडित मुलीला शरीर संबंध ठेवण्यासाठी चंदिगढला नेल्याचेही सिद्ध होते असे न्यायाधिशांनी यावेळेस स्पष्ट केले.