वरवंड परिसरात बाजरी काढणीला वेग

By admin | Published: October 30, 2016 10:47 PM2016-10-30T22:47:00+5:302016-10-30T22:47:00+5:30

वरवंड : परिसरामध्ये उशिरा का होईना पावसाने दिलेल्या हजेरीमुळे बाजरी पीक जोमात आल्यानंतर शेतकर्‍यांची भरलेली कणसे काढून मळणी करण्यात वरवंड, पडवी, माळवाडी, हातवळण, कडेठाण या परिसरातील शेतकर्‍यांची लगबग चालू आहे.

Wheel harvesting speed in Varvand area | वरवंड परिसरात बाजरी काढणीला वेग

वरवंड परिसरात बाजरी काढणीला वेग

Next
वंड : परिसरामध्ये उशिरा का होईना पावसाने दिलेल्या हजेरीमुळे बाजरी पीक जोमात आल्यानंतर शेतकर्‍यांची भरलेली कणसे काढून मळणी करण्यात वरवंड, पडवी, माळवाडी, हातवळण, कडेठाण या परिसरातील शेतकर्‍यांची लगबग चालू आहे.
दौंड तालुक्यात उशिरा पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता. यावर्षी तरी पाऊस होतो का नाही, अशी चिंता शेतकर्‍यांना होती. मात्र पावसाने उशिरा का होईना हजेरी लावल्यामुळे बाजरी पीक जोमात आले आहे. हे पीक शेतकरी काढून मळणीसाठी लगबग चालू आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजरी पीक काढून वाळवण्यात येत आहे. बाजरीची कणसे वाळल्यानंतर ते मशिनने मळणी केली जाते. या मळणीला चार ते पाच जण काम करीत असतात.
फोटो ओळ-बाजरीपिकाची मळणी करताना शेतकरीवर्ग.

Web Title: Wheel harvesting speed in Varvand area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.