...जेव्हा अमित शहाही सीबीआयपासून चार दिवस लपले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 11:01 AM2019-08-22T11:01:53+5:302019-08-22T11:09:54+5:30

2005 मध्ये झालेल्या सोहराबुद्दीन एन्काऊंटर केसमध्ये 25 जुलै 2010 ला अमित शहांना सीबीआयने अटक केली होती.

... when Amit Shah untraced for four days from CBI; Chidambaram was the Home Minister at the center | ...जेव्हा अमित शहाही सीबीआयपासून चार दिवस लपले होते

...जेव्हा अमित शहाही सीबीआयपासून चार दिवस लपले होते

googlenewsNext

राजकारणात कोणावर काय वेळ येईल सांगता येत नाही. आजचा राव उद्याचा रंक होईल, की आजचा रंक उद्याचा राव होईल. काहीसे असेच माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम आणि सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबतीत घडले आहे. फरक एवढाच आहे, ९ वर्षांपूर्वी अमित शहागुजरातचे गृहमंत्री होते आणि चिदंबरम सध्या माजी मंत्री आहेत. 


2005 मध्ये झालेल्या सोहराबुद्दीन एन्काऊंटर केसमध्ये 25 जुलै 2010 ला अमित शहांना सीबीआयने अटक केली होती. सोहराबुद्दीन केसमध्ये उच्च न्यायालयाने अमित शहांना जामीन नाकारला होता. यामुळे सीबीआय अमित शहांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेली होती. मात्र, शहा तेथे आढळले नव्हते. पुढील ४ दिवस शहा लपलेले होते. यानंतर ते थेट गांधीनगरयेथील भाजपाच्या कार्यालयात बैठकीला आले तेथे त्यांना अटक करण्यात आली. गेल्या दोन दिवसांत अशीच काहीशी वेळ तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्यावर आली आहे. 


सीबीआयला 26 जुलै पर्यंत सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. शहांविरोधात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तत्कालीन मोदी सरकारच्या गृहमंत्रीपदाचा अमित शहा यांनी राजीनामा दिला होता. 2005 मध्ये सोहराबुद्दीन हैदराबादहून सांगलीला बसने येत होता. त्यावेळी वाटेतून त्याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सोहराबुद्दीनचा फेक एन्काऊन्टर केल्याचा, अपहरण, खंडणी असे आरोप शहांवर होते. तसेच या एन्काऊंटरनंतर तीन दिवसांनी त्याची पत्नी कौसर बीला ठार करण्यात आले होते. 


मॅजिस्ट्रेटनी शाह यांना 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांना 7 ऑगस्टपर्यंत साबरमती तुरुंगात पाठविण्यात आले होते. यावेळी शहांनी न्याय़व्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगितले होते. अखेर शहांना गुजरातमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने 2012 मध्ये जेव्हा शाह गुजरातमध्ये परतले तेव्हा त्यांनी एक शेर ऐकवला होता.


अमित शहांनी ऐकवलेला शेर आज खरा केला....
''મારી ઓટ જોઈ કોઈ કિનારે ઘર ન બાંધે, હું સમંદર છું, પાછો આવીશ.'' म्हणजेच ''माझी ओहोटी पाहून, किनाऱ्यावर घर बांधू नको; मी समुद्र आहे, पुन्हा जरूर येईन''. आज अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि चिदंबरम यांच्यामागे सीबीआय, ईडी लागली आहे. यामुळे पुढील घडामोडी नक्कीच पाहण्यासारख्या असतील. 

Web Title: ... when Amit Shah untraced for four days from CBI; Chidambaram was the Home Minister at the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.