जेव्हा मुख्यमंत्री हाती घेतात बैलांचा कासरा...

By Admin | Published: January 10, 2016 11:27 PM2016-01-10T23:27:47+5:302016-01-10T23:27:47+5:30

जळगाव : डॉ.आप्पासाहेबपुरस्कार वितरण सोहळ्याच्यानिमित्ताने जळगावात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अधिकाधिक वेळ जैनहिल्स येथील संशोधन केंद्रात शेतकरी व शेततज्ज्ञांशी चर्चेत घालविला. शेताच्या मातीत पाय पडताच फडणवीस हे मुख्यमंत्रीपद विसरून आपल्या मूळ कास्तकाराच्या भूमिकेत शिरले. बैलजोडीच्या सहाय्याने चालणार्‍या या पेरणी यंत्राचा कासरा हाती घेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.

When the Chief Minister takes the bullock's kaasara ... | जेव्हा मुख्यमंत्री हाती घेतात बैलांचा कासरा...

जेव्हा मुख्यमंत्री हाती घेतात बैलांचा कासरा...

googlenewsNext
गाव : डॉ.आप्पासाहेबपुरस्कार वितरण सोहळ्याच्यानिमित्ताने जळगावात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अधिकाधिक वेळ जैनहिल्स येथील संशोधन केंद्रात शेतकरी व शेततज्ज्ञांशी चर्चेत घालविला. शेताच्या मातीत पाय पडताच फडणवीस हे मुख्यमंत्रीपद विसरून आपल्या मूळ कास्तकाराच्या भूमिकेत शिरले. बैलजोडीच्या सहाय्याने चालणार्‍या या पेरणी यंत्राचा कासरा हाती घेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.
कृषि संशोधन केंद्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणार्‍या पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार आधुनिक कृषि उच्च-तंत्र पुरस्कार सोहळ्यासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावी मुक्कामी राहिले. रविवारी अधिकाधिक वेळ त्यांनी जैन हिल्स येथील संशोधन केंद्रात घालविला. संत्रा व लिंबूवर्गीय पिकांमध्ये प्रक्रिया योग्य असलेल्या स्वीट लेमन अर्थात मोसंबीच्या संशोधन केंद्राला त्यांनी भेट देऊन सर्व माहिती घेतली. टिश्युकल्चर लॅब, बायोटेक लॅब, संशोधन केंद्राच्या शेतीवर लावण्यात आलेली केळी, डाळींब, आंबा, पेरू, मोसंबी आदी पिकांची माहिती घेत त्याच ठिकाणी कांदा पेरणी यंत्राची पाहणी केली.
जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी त्यांना माहिती दिली.
वेळ, पैसा, श्रम वाचविणारे कांदा पेरणी यंत्र
कांदा पेरणी यंत्राच्या सहाय्याने केवळ एक व्यक्ती २ तासात एक एकर क्षेत्रावर कांदा पेरणी करू शकतो. तर पारंपरिक कांदा पेरणीला एक एकरासाठी साधारणत: ४० मजूर एका दिवसाकरीता लागतात. त्यावर ५ हजार रुपये खर्च येतो व पेरणीसाठी पूर्ण दिवस खर्ची पडतो. मात्र साधारण ७० किलो वजनाच्या या यंत्रामुळे केवळ एक बैलजोडीच्या सहाय्याने एक व्यक्ती फक्त दोन तासात एक एकरावर कांदा बी पेरतो. अवघ्या १७ हजार रुपये किंमतीत येणारे हे यंत्र पेरणी झाल्यावर इतर शेतकर्‍यांनाही उपलब्ध करून देता येऊन त्यातूनही उत्पन्न मिळविता येते. विशेषत: परंपरिक पद्धतीत कांदा नर्सरीत लावून नंतर त्याची लागवड करावी लागते. त्यामुळे ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी लागतो. मात्र १८० दिवसांत येणारे कांदापीक यंत्राद्वारे लागवड केल्यास अवघ्या १५० दिवसांत येते. वेळ, श्रम व पैशाची मोठ्या प्रमाणावर बचत या यंत्रामुळे होत असल्याने शेतकर्‍यांसाठी ते वरदान ठरले आहे. या यंत्राने पेरणी केल्यामुळे रोपांची संख्या, अंतर योग्य राखता येऊन त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन वाढते. शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या या यंत्रापाठोपाठ जैन इरिगेशनने कांदा काढणी किंवा कांदा हार्वेस्टर देखील तयार केला आहे.
-----
फोटो कॅप्शन-११जळगावसीएमव्हीजीट- बैलजोडीच्या सहाय्याने चालणार्‍या कांदा पेरणी यंत्राचा कासरा हाती घेऊन बैलजोडी हाकताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Web Title: When the Chief Minister takes the bullock's kaasara ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.