न्यायालय सुरू असताना कैद्याचे कारागृहातून पलायन सुरक्षेचे धिंडवडे : बोदवड पोलीस आले होते घेण्यासाठी, दुसर्‍यांदा केले पलायन

By admin | Published: May 26, 2016 10:58 PM2016-05-26T22:58:11+5:302016-05-26T22:58:11+5:30

जळगाव: जबरी चोरीच्या गुन्‘ात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुधाकर मधुकर पवार (वय १९ रा.भिल्लवाडी, बोदवड) याने उपजिल्हा कारागृहातून २५ फुट उंच भींत ओलांडून पळ काढल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे कारागृहात न्यायालय सुरू असताना हा प्रकार घडल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. यापूर्वीही पवार हा बोदवड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

When the court started, the prisoner's escape from the prison inmates was carried out; | न्यायालय सुरू असताना कैद्याचे कारागृहातून पलायन सुरक्षेचे धिंडवडे : बोदवड पोलीस आले होते घेण्यासाठी, दुसर्‍यांदा केले पलायन

न्यायालय सुरू असताना कैद्याचे कारागृहातून पलायन सुरक्षेचे धिंडवडे : बोदवड पोलीस आले होते घेण्यासाठी, दुसर्‍यांदा केले पलायन

Next
गाव: जबरी चोरीच्या गुन्‘ात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुधाकर मधुकर पवार (वय १९ रा.भिल्लवाडी, बोदवड) याने उपजिल्हा कारागृहातून २५ फुट उंच भींत ओलांडून पळ काढल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे कारागृहात न्यायालय सुरू असताना हा प्रकार घडल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. यापूर्वीही पवार हा बोदवड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
बोदवड पोलीस स्टेशनला दाखल गु.र.नं.२४/२०१६ भादवि कलम ३९९, ४०० व ३५३ या गुन्‘ात अटक असलेल्या पवार याला १४ मे २०१६ रोजी उपकारागृहात आणले होते. १० मे २०१६ रोजी त्याला अटक झाली होती. त्यानंतर त्याला भुसावळ कारागृहात पाठविण्यात आले होते तेथून जळगावला हलविण्यात आले होते.
बोदवड पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी त्याला घेण्यासाठी गुरुवारी दुपारी साडे बारा वाजता कारागृहात आले होते. याच वेळी न्यायालयदेखील सुरू होते.अधीक्षक डी.टी.डाबेराव यांच्या दालनाजवळ त्याला बोलावण्यात आले होते. कागदपत्रांची पूर्तता करत असताना तो हळूच तेथून बाजूला सरकला व तट क्रमांक चार जवळील भीतींच्या बीमवरुन चढून पसार झाला. भींतीला लागून दोन फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. २३ फुटाची भींत अशा २५ फूट अंतरावर चढूनत्याने कारागृहाच्या बाहेर उडी घेतली.
अन् शोधाशोध सुरू झाली
कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पवार याला बोलावले असता तो जागेवर नव्हता. यावेळी सर्व बराक शोधण्यात आले. चार क्रमांक तटाजवळ त्याची चप्पल तेथे आढळून आल्याने तो पसार झाल्याची खात्री झाली. डाबेराव यांच्या निवासस्थानाच्या बाजूने बाहेरुन शोध घेतला असता त्याने उडी मारलेल्या जागेवर हाताच्या व पायाच्या खुणा आढळून आल्या. विशेष म्हणजे तट क्रमांक तीनजवळ होमगार्ड रवींद्र मनोहर काकडे यांची ड्युटी लावण्यात आली होती, मात्र उन्हामुळे ते सावलीत थांबले होते.
यापूर्वीही केले होते पलायन
पवार याने काही महिन्यापूर्वी बोदवड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले होते. त्यावेळी एक उपनिरीक्षक व दोन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याने हा दुसर्‍यांदा प्रकार केला. जळगावच्या कारागृहातून कैदी पळून जाण्याची पहिलीच घटना आहे. त्यामुळे कारागृहाचे अधिकारी व कर्मचारी कमालीचे हादरले आहेत.

Web Title: When the court started, the prisoner's escape from the prison inmates was carried out;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.