शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ कधी?
By admin | Published: September 11, 2015 05:31 AM2015-09-11T05:31:34+5:302015-09-11T05:31:34+5:30
ओडिशात ‘किसान बचाओ’ पदयात्रेस सुरुवात करीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर
- राहुल गांधींचा सवाल
बारगड (ओडिशा) : ओडिशात ‘किसान बचाओ’ पदयात्रेस सुरुवात करीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवताना, शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ कधी येणार, असा बोचरा सवाल त्यांनी केला. मोदी सरकार शेतकऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पश्चिम ओडिशाच्या बारगड जिल्ह्णाच्या देबहाल येथून राहुल यांनी ‘किसान बचाओ’ पदयात्रेला सुरुवात केली. गरिबीमुळे जीवनयात्रा संपविणारे सानंद कथार या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर राहुल यांनी पदयात्रेस प्रारंभ केला.
मोदी सरकार
सत्तेत आल्यापासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोदी सरकारने बळीराजाला वाऱ्यावर
सोडले आहे. शेतकऱ्यांकडून जमिनी बळकावून त्या कार्पोरेट घराण्यांच्या
घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे.
- राहुल गांधी