आयटीआयची परीक्षा कधी? देशातील २३ लाख प्रशिक्षणार्थी संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:04 PM2020-06-23T12:04:53+5:302020-06-23T12:09:50+5:30

आयटीआय परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने होणार याबाबत साशंकता; कुशल मनुष्यबळ निर्मितीला खीळ बसण्याची शक्यता

When is the ITI exam? 23 lakh trainees in the country in confusion | आयटीआयची परीक्षा कधी? देशातील २३ लाख प्रशिक्षणार्थी संभ्रमात

आयटीआयची परीक्षा कधी? देशातील २३ लाख प्रशिक्षणार्थी संभ्रमात

Next
ठळक मुद्देपरीक्षा केंद्रासाठी प्रशिक्षणार्थींना देण्यात येणारे प्रवेशपत्र व ओळखपत्र उपलब्ध होण्यास विलंब ऑनलाइन अभ्यास; मात्र सराव बंद औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज

नारायण बडगुजर
पिंपरी : देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) परीक्षा दरवर्षी जुलै किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला होतात. कोरोनामुळे त्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र, परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने होणार, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे २३ लाख प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक व पालक संभ्रमात आहेत. 
परीक्षेसंबंधी अद्याप कोणतीही माहिती प्रशिक्षण संस्थांना आलेली नाही. त्यामुळे जुलैमध्ये परीक्षा अशक्य असल्याचे सांगण्यात येते. परीक्षा कधी होणार हे निश्चित नाही, तसेच नवे प्रवेश कधी सुरु होणार हे देखील स्पष्ट नसल्याने कुशल मनुष्यबळ निर्मितीला खीळ बसण्याची शक्यता आहे. राज्यातील पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद यांसह इतरही जिल्ह्यांत एमआयडीसी आहेत. या औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज असते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून असे कुशल मनुष्यबळ निर्माण होते. ज्याचे संचलन केंद्रीय स्तरावरून होते. प्रशिक्षण महानिदेशालयाकडून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाते. एकाच वेळेस आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया होते. परीक्षादेखील एकाच वेळी होते. वेळापत्रक एकसारखेच असते. 
महाराष्ट्रासह काही राज्यांत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे अशा राज्यांत आयटीआयच्या परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबत केंद्राच्या प्रशिक्षण महानिदेशालयाच्या संचालक पातळीवरून विविध पर्यायांचा  विचार सुरू आहे. आयटीआयच्या परीक्षेसाठी संबंधित प्रशिक्षणार्थींची माहिती, फोटोसह परीक्षेचा अर्ज ऑनलाइन भरला जातो. त्याची प्रक्रिया मे-जूनमध्ये होते. यंदा कोरोनामुळे ही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रासाठी प्रशिक्षणार्थींना देण्यात येणारे प्रवेशपत्र व ओळखपत्र उपलब्ध होण्यास विलंब होणार आहे. 

......................................

ऑनलाइन अभ्यास; मात्र सराव बंद 
इतर शैक्षणिक संस्थांप्रमाणेच आयटीआय बंद आहेत. कार्यालयीन कामकाज सुरू आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना आयटीआयमध्ये जाता येत नाही. परिणामी सराव (प्रॅक्टिकल) थांबला आहे. मात्र, त्यांना ऑनलाइन अभ्यास देण्यात येत आहे. संबंधित विषयाचे शिक्षक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून नियमित अभ्यास देतात. तसेच त्याबाबत महिनाभराचा अहवाल संबंधित शिक्षक गटनिर्देशक किंवा प्राचार्यांकडे सादर करतात.   

प्रशिक्षणार्थींना ऑनलाइन अभ्यास दिला जात आहे. परीक्षांबाबत अद्याप सूचना किंवा निर्देश आलेले नाहीत. वरिष्ठ पातळीवरून निर्देश आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल. 
- शशिकांत पाटील, प्राचार्य, आयटीआय, मोरवाडी, पिंपरी 

.....................................

देशभरातील आकडेवारी
एकूण आयटीआय - १४९१७  
प्रशिक्षणार्थी - २३१४०००
शासकीय आयटीआय - ३०६२
एकूण प्रशिक्षणार्थी - ४६२१३९

.............................................

महाराष्ट्रातील आकडेवारी
एकूण आयटीआय - ९८५
एकूण विद्यार्थी - ९४१४२
शासकीय आयटीआय -४२०
एकूण प्रशिक्षणाथी - ६७१२६

Web Title: When is the ITI exam? 23 lakh trainees in the country in confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.