लालूप्रसाद नितीश कुमारांच्या खुर्चीवर बसतात तेव्हा..!
By admin | Published: February 13, 2017 09:11 PM2017-02-13T21:11:54+5:302017-02-13T21:19:22+5:30
येथील एसके मेमेरियल हॉलमधील एका कार्यक्रमात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव अनावधाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या खुर्चीवर विराजमान झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
पाटना, दि. 13 - येथील एसके मेमेरियल हॉलमधील एका कार्यक्रमात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव अनावधाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या खुर्चीवर विराजमान झाले. मात्र नंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना खुर्ची खाली करून दिली.
रविवारी (दि.12) संध्याकाळी पाचच्या सुमारास एसके मेरोरियल हॉलमध्ये ब्रह्माकुमारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह लालूप्रसाद यादव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमाला एसके मेमेरियल हॉलमध्ये लालू प्रसाद यांच्यासह त्यांच्या पार्टीचे आमदार भोला यादव आणि माजी खासदार शिवानंद तिवारी दाखल झाले. यावेळी लालू प्रसाद यादव यांना आयोजनकांनी व्यासपीठाकडे जाण्यास सांगितले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पाच खुर्च्या ठेवण्यात आल्या होता. त्यातील चार खुर्च्यांवर काही मान्यवरमंडळी बसली होती आणि मधील खुर्ची प्रमुख पाहुणे असलेल्या मुख्यमंत्र्यांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर लालू प्रसाद आले व ते अनावधाने राखीव खुर्चीवर विराजमान झाले. त्यानंतर येथील एका आयोजकाने लगेच व्यासपीठावर दुसरी खुर्ची आणली व मध्येच ठेवली आणि त्यांच्या कानात सांगितले की सदर खुर्ची मुख्यमंत्र्यांसाठी आहे. यावेळी लालूप्रसाद गोंधळून गेले आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून बाजूच्या खुर्चीवर विराजमान झाले आणि मुख्यमंत्र्यांसाठी खुर्ची खाली करून दिली.