"आई जिवंत होती, तेव्हा मी वाढदिवसाला...", PM मोदींनी सांगितली आईसोबतची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 03:12 PM2024-09-17T15:12:59+5:302024-09-17T15:15:34+5:30
PM Modi meet Adivasi family odisha : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरे मिळालेल्या आदिवासी कुटुंबाच्या घरी भेट दिली. त्यानंतर सभेत बोलताना मोदींनी आईसोबतच्या आठवणीला उजाळा दिला.
PM Modi News : ओडिशा दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना आईची आठवण झाली. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस असून, त्यांनी पंतप्रधान आवास योजतेतंर्गत घर मिळालेल्या आदिवासी कुटुंबाला भेट दिली आणि संवाद साधला. यावेळी त्यांना आदिवासी महिलेने खिरी खायला दिली. या प्रसंगाबद्दल सांगताना पंतप्रधान मोदींना आईची आठवण झाली.
भुवनेश्वर येथे झालेल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आई हीराबेन यांची आठवण झाली.
आदिवासी महिलेने मोदींना दिली खिरी
पंतप्रधान मोदी म्हणाले, "इथे येण्यापूर्वी मी आपल्या एका आदिवासी कुटुंबाच्या गृह प्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या कुटुंबालाही नवीन घर मिळाले आहे. त्या कुटुंबाचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरील संतोष मी कधीही विसरू शकत नाही. त्या आदिवासी कुटुंबाने मला, माझ्या बहिणीने मला आनंदाने खिरी खाऊ घातली. मी जेव्हा खिरी खात होतो, तर आईची आठवण येणे स्वाभाविक होते."
आदिवासी आईने वाढदिवसाचा आशीर्वाद दिला - मोदी
मोदी पुढे म्हणाले, "कारण जेव्हा माझी आई जिवंत होती, तेव्हा मी वाढदिवसाला नेहमी आईचे आशीर्वाद घ्यायला जायचो. आणि आई मला गूळ खाऊ घालायची. पण, आता आई तर नाहीये. आज एका आदिवासी आईने खीर खायला देऊन मला वाढदिवसाला आशीर्वाद दिला."
प्रधानमंत्री श्री @narendramodi आज भुबनेश्वर, ओडिशा में प्रधानमंत्री आवास योजना के लाभार्थी एक आदिवासी परिवार से मिलने उनके घर गए।
— BJP (@BJP4India) September 17, 2024
वहां उन्होंने लाभार्थी के परिवार के साथ आत्मीय संवाद किया।
#OdishaWelcomesModipic.twitter.com/bvCFOowqsq
"हा अनुभव, ही भावना माझ्या संपूर्ण आयुष्याची कमाई आहे. गाव, गरीब, दलित, वंचित, आदिवासी समाजाच्या आयुष्यात होत असलेला हा बदल. त्यांचे हे सुख मला आणखी काम करण्यासाठी प्रेरणा देतात", असे मोदी यावेळी म्हणाले.
#WATCH | Bhubaneswar, Odisha: PM Modi says, "Before coming here, I went to the home of an Adivasi family to attend their Grih Pravesh event... My sister in that family gave me Khiri to eat. And when I was eating that Khiri, it was obvious that I missed my mother. When my mother… pic.twitter.com/ycxPmRcqP5
— ANI (@ANI) September 17, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशा दौऱ्यात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरे मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी भेटी दिल्या. या कुटुंबीयांसोबत मोदी यांनी गप्पा मारल्या.