Odisha Train Accident : मृतदेहातील एकाने अचानक पकडला वाचविणाऱ्याचा पाय अन्...! अपघातानंतर बचावादरम्यानची शहारा आणणारी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 10:03 AM2023-06-07T10:03:00+5:302023-06-07T10:03:44+5:30
ओडिशामध्ये शुक्रवारी (2 जून) भीषण रेल्वे अपघात झाला. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. घटना स्थळावरून अनेक मृतदेह आणून, जवळच्याच ...
ओडिशामध्ये शुक्रवारी (2 जून) भीषण रेल्वेअपघात झाला. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. घटना स्थळावरून अनेक मृतदेह आणून, जवळच्याच एका शाळेच्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान बचाव कार्यातील एक कर्मचारी या रूममध्ये गेला आणि त्याच वेळी मृतदेहांतील एकाने त्याचा पाय पकडला. हा संपूर्ण प्रकार अंगावर शहारा आणणारा आणि धक्कादयक होता.
यानंतर बचाव पथकातील या कर्मचाऱ्याने हिंमत करून मृतदेहांमधील संबंधित 35 वर्षांच्या रॉबिन नैयाला पाहिले. तर त्याचे दोन्ही पाय तुटलेले होते आणि त्यांना मृत समजून तेथे आणण्यात आले होते. रॉबिन जिवंत असल्याचे समजताच त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शॉक लागून झाला 40 जणांचा मृत्यू... -
ओडिशा ट्रेन अपघातानंतर, रेल्वेच्या चौकशीत आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आता वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. आता अपघाताची चौकशी करत असलेल्या रेल्वे पोलिसांनी म्हटले आहे की, 40 जणांच्या शरिरावर कसल्याही प्रकारचा मार लागल्याच्या खुना आढळून आल्या नाहीत आणि त्यांचा मृत्यू शॉक लागल्याने झाल्याचे मानले जात आहे. या रेल्वे अपघातात 278 जणांचा मृत्यूझाला तर जवळपास 1200 लोक जखमी जाले आगते.