UP Assembly Election 2022: सत्ता येताच राज्यात मोटारसायकलवर 'ट्रिपल सीट'ला परवानगी देऊ अन्...; ओम प्रकाश राजभर यांची अजब घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 03:16 PM2022-02-09T15:16:56+5:302022-02-09T15:17:45+5:30

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रंग संपूर्ण देशावर चढलेला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक राजकीय पक्ष विविध घोषणा आणि आश्वासानं मतदार राजाला देऊ लागले आहेत.

When our govt comes to power, 3 riders will be able to ride a bike for free says SBSP founder & chief OP Rajbhar | UP Assembly Election 2022: सत्ता येताच राज्यात मोटारसायकलवर 'ट्रिपल सीट'ला परवानगी देऊ अन्...; ओम प्रकाश राजभर यांची अजब घोषणा

UP Assembly Election 2022: सत्ता येताच राज्यात मोटारसायकलवर 'ट्रिपल सीट'ला परवानगी देऊ अन्...; ओम प्रकाश राजभर यांची अजब घोषणा

googlenewsNext

उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रंग संपूर्ण देशावर चढलेला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक राजकीय पक्ष विविध घोषणा आणि आश्वासानं मतदार राजाला देऊ लागले आहेत. यातच पुढचं पाऊल टाकत सुहेलदेव भारतीय समाज पार्टीनं (Suheldev Bharatiya Samaj Party) एक उत्तर प्रदेशच्या जनतेसाठी एक मोठी घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी सत्तेत येताच राज्यात मोटारसायकलवरुन ट्रिपल सीट वाहतुकीला परवानगी देऊ, नाहीतर रेल्वे आणि जीपमधून क्षमतेबाहेर प्रवास केल्याबाबत दंड आकारू, असं आश्वासन जनतेला दिलं आहे. 

रेल्वेच्या एका बोगीत आसनक्षमता ७० प्रवाशांची असतानाही ३०० प्रवासी प्रवास करतात आणि त्यावर कोणताही दंड आकारला जात नाही. मग मोटारसायकलवर एक प्रवासी अधिक असला तर दंड का आकारला जातो? आमचं सरकार राज्यात आलं तर आम्ही ट्रिपल सीट प्रवासाला परवागनी देऊ, असं राजभर म्हणाले. 

दलित आणि मागासवर्गीय समाजाचं नेतृत्त्व करणारे सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरत आहेत. बसपाचे संस्थापक काशी राम यांच्या राजकारणाचे धडे घेतलेले ओम प्रकाश राजभर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये मागासवर्गीय कल्याणमंत्री राहिले आहेत. पण त्यांची बंडखोर वागणूक पाहता योगी सरकारनं त्यांची कॅबिनेटमधून गच्छंती केली होती. 

नेमकं काय म्हणाले राजभर पाहा...

Web Title: When our govt comes to power, 3 riders will be able to ride a bike for free says SBSP founder & chief OP Rajbhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.