अर्थाचा अनर्थ ! पीएमओकडून ट्विट करताना घोडचूक, नेटक-यांनी घेतला खरपूस समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 07:07 PM2018-02-09T19:07:37+5:302018-02-09T20:20:09+5:30

अनेकांनी पंतप्रधान मोदींना यानंतर धारेवर धरलं तर मोदींचे समर्थकही त्यांची बाजू मांडण्यासाठी सरसावले...

When PMO’s tweet typo got Twitterati going all-out ‘grammar school’ on PM Narendra Modi | अर्थाचा अनर्थ ! पीएमओकडून ट्विट करताना घोडचूक, नेटक-यांनी घेतला खरपूस समाचार

अर्थाचा अनर्थ ! पीएमओकडून ट्विट करताना घोडचूक, नेटक-यांनी घेतला खरपूस समाचार

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) करण्यात आलेल्या एका ट्विटचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला जात आहे. पीएमओने हे ट्विट करताना एक चूक केली आणि अर्थाचा घोर अनर्थ झाला. या ट्विटमध्ये एक स्वल्पविराम (कॉमा) देण्यास पीएमओ कार्यालय विसरलं आणि मोदी सरकारवर टीका करण्याची संधी शोधणा-यांच्या हातात आयतं कोलीत मिळालं. अनेकांनी पंतप्रधान मोदींना या ट्विटमुळे धारेवर धरलं तर मोदींचे समर्थकही त्यांची बाजू मांडण्यासाठी सरसावले, पण टीका करणा-यांची संख्या जास्त होती. 
या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींद्वारे राज्यसभेत केलेल्या भाषणाचा उल्लेख करण्यात आला होता. चला आपण सर्व एकत्र मिळून गरीबांना चांगली गुणवत्ता असलेली आणि स्वस्त आरोग्यसेवा मिळेल यासाठी काम करू असं मोदी राज्यसभेत म्हणाले होते. पण ट्विट करताना गरीब आणि चांगली यामध्ये स्वल्पविराम देण्यास पीएमओ कार्यालय विसरलं. आपण सर्वांनी एकत्र मिळून खराब गुणवत्ता असलेली स्वस्त आरोग्यसेवा मिळेल यासाठी काम करू असा त्याचा अर्थ झाला. 

पंतप्रधान कार्यालयाकडून हे ट्विट येताच त्यावर टीका होण्यास सुरूवात झाली. या ट्विटला रिप्लाय देताना एका तरूणीने ट्विट केलं...''खराब आणि स्वस्त आरोग्यसेवा...मला आश्चर्य वाटलं नाही...यापेक्षा दुसरं काहीही होऊ शकत नाही''. ''भाजपाला शाळेत जाण्याची गरज आहे'' असं ट्विट एका युझरने केलं. ''अखेर सत्य बोलण्याची तुम्ही हिंमत केलीच....हे मान्य केल्याबद्दल तुमचे आभार'' असं ट्विट आणखी एका युझरने केलं . तर ''एक कॉमा चुकल्यामुळे कोमात जाण्याची वेळ आली'' असं ट्विटही एकाने केलं. 



























 

Web Title: When PMO’s tweet typo got Twitterati going all-out ‘grammar school’ on PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.