मावळत्या सूर्याचा रंग लाल पण उगवत्या सूर्याचा रंग भगवा असतो - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 07:08 PM2018-03-03T19:08:58+5:302018-03-03T19:08:58+5:30
ईशान्य भारतातील लोकांना असे वाटायचे कि, दिल्ली त्यांच्यापासून दूर आहे पण आज आम्ही अशी स्थिती निर्माण केली कि, दिल्ली स्वत:हून चालत त्यांच्या दरवाज्याजवळ गेली आहे.
नवी दिल्ली - सूर्य मावळतो तेव्हा त्याचा रंग लाल असतो पण तोच सूर्य उगवतो तेव्हा त्याचा रंग भगवा असतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईशान्य भारतात त्रिपुरा आणि नागालँडमध्ये मिळालेल्या विजयाचे वर्णन केले.
- ईशान्य भारतातील लोकांना असे वाटायचे कि, दिल्ली त्यांच्यापासून दूर आहे पण आज आम्ही अशी स्थिती निर्माण केली कि, दिल्ली स्वत:हून चालत त्यांच्या दरवाज्याजवळ गेली आहे.
- माझ्याकडे आता आकडे नाहीत पण त्रिपुरामध्ये भाजपाचे जे उमेदवार निवडून आलेत ती सर्वात तरुण टीम आहे. आपल्या वयामुळे लोक आपल्याला नाकारतील अशी भिती त्यांच्या मनात होती. पण या तरुण उमेदवारांनी लोकांचा विश्वास जिंकला.
- ईशान्य भारत देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल.
- निवडणुकीतील जय-पराजय लोकशाहीचा भाग आहे. लोकशाहीचे ते सौंदर्य आहे. त्यामुळे पराभवालाही खिलाडूवृत्तीने स्वीकारले पाहिजे.
- त्रिपुरामध्ये आज सत्ता आली असली तरी अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे. भय आणि भ्रम पसरवणाऱ्या डाव्यांना आज जोरदार प्रत्युत्तर मिळाले आहे.
- काँग्रेस संस्कृती आपल्यात येऊ नये यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सर्तक राहण्याची गरज आहे.
- पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेस आपला मुख्यमंत्री समजत नाही. स्वतंत्र सैनिकासारखे त्यांचे काम चालू असते.
- एककाळ असा होता कि देशाच्या अनेक भागात भाजपाची स्वत:ची अशी संघटनात्मक ताकत नव्हती पण आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपाचा विस्तार झाला आहे.
The North East has today come forward to lead India on the path to development: PM Narendra Modi pic.twitter.com/CoveqLgjwq
— ANI (@ANI) March 3, 2018
North East ke logon ko ye lagta tha ki Dilli unse door hai, lekin humne sthiti ye paida ki, kiDilli aaj khud chal kar North East ke darawaaze pe aa gayi: PM Narendra Modi pic.twitter.com/5g64wzZTRS
— ANI (@ANI) March 3, 2018