संपूर्ण व्यापमंचा तपास केव्हा हाती घेणार ?

By admin | Published: July 25, 2015 12:06 AM2015-07-25T00:06:11+5:302015-07-25T00:06:11+5:30

निगराणीच्या मुद्यावर निर्णय घेता यावा यासाठी व्यापमं घोटाळा प्रकरणांचा संपूर्ण तपास हाती घेण्यासाठी किती वेळ लागणार, याबद्दलची माहिती

When to take care of the whole business? | संपूर्ण व्यापमंचा तपास केव्हा हाती घेणार ?

संपूर्ण व्यापमंचा तपास केव्हा हाती घेणार ?

Next

नवी दिल्ली : निगराणीच्या मुद्यावर निर्णय घेता यावा यासाठी व्यापमं घोटाळा प्रकरणांचा संपूर्ण तपास हाती घेण्यासाठी किती वेळ लागणार, याबद्दलची माहिती एक आठवड्याच्या आत देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला दिले.
मध्य प्रदेशच्या एसआयटी/ एसटीएफच्या हातात असलेला व्यापमं घोटाळ्याचा संपूर्ण तपास तुम्ही (सीबीआय) नेमका केव्हा आपल्या हाती घेणार, हे आम्हाला जाणून घ्यावयाचे आहे. कारण सीबीआय चौकशीवर आम्ही निगराणी ठेवायची की अन्य कुणाला निगराणीसाठी सांगायचे आणि निगराणीसाठी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे, याबद्दल आम्हाला निर्णय घ्यावयाचा आहे, असे पीठाने म्हटले आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ जुलैपर्यंत स्थगित केली.
सीबीआयचे प्रतिनिधित्व करणारा वकील केव्हा नेमणार, अशी विचारणाही या पीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग यांना केली. या व्यापमं घोटाळ्यातून मोठ्या प्रमाणावर प्रकरणे पुढे येत असल्याने सीबीआयचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एकापेक्षा जास्त वकिलांची गरज पडेल, असे मध्य प्रदेश सरकारचे वकील एल. नागेश्वर राव म्हणाले. तर आपण पुढच्या शुक्रवारी या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यास सक्षम असणार, असे मनिंदर सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)




 

Web Title: When to take care of the whole business?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.