अग्निशमन विभाग सुसज्ज केव्हा होणार?
By admin | Published: January 23, 2015 11:06 PM2015-01-23T23:06:25+5:302015-01-23T23:06:25+5:30
शहराचा विकास : उंच इमारतीत आग लागल्यास नियंत्रण यंत्रणा नाही
Next
श राचा विकास : उंच इमारतीत आग लागल्यास नियंत्रण यंत्रणा नाहीनागपूर : विस्तारासोबतच शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. परंतु महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे १५-२० वर्षापूर्वी जी यंत्रणा होती तीच आजही आहे. शहरात २०-२२ मीटर उंचीच्या इमारतीत आग लागल्यास ती आटोक्यात आणणारी यंत्रणा या विभागाकडे नाही. हा विभाग सुसज्ज केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.आपत्ती व्यवस्थापनावर दरवर्षी चर्चा होते. पावसाळा व उन्हाळ्याच्या दिवसात आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असल्याचा दावा केला जातो. परंतु अग्निशमन विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने उंच इमातीला आग लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.१५ वर्षापूर्वी शहरात पाच अग्निशमन केंद्रे होती. विभागात ३०० कर्मचारी व अधिकारी होते. मागील काही वर्षात शहराचा विस्तार होऊ न लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. १० अग्निशमन केंद्रे झाली परंतु विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या मात्र आजही तितकीच आहे. शहरात हुडकेश्वर, नरसाळा भागाचा समावेश करण्यात आला आहे. मिहान सारखे मोठे प्रकल्प उभे राहात आहेत. एम्प्रेस सिटी, आनंदम् यासारख्या टोलेजंग इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. बैद्यनाथ चौकाच्या बाजूला भव्य मॉल्स व निवासी संकुल उभारले जात आहे. सोबतच शहरात ४५ ते ६० मीटर उंचीच्या इमारती उभ्या राहात आहेत. परंतु अशा इमारतीच्या वरच्या माळ्यावर आग लागल्यास ती आटोक्यात आणता येणारी टीटीएलसारखी यंत्रणा अग्निशमन विभागाकडे नाही. (प्रतिनिधी)चौकट...प्रस्ताव प्रलंबित शहराचा होत असलेला विकास विचारात घेता अग्निशमन विभागाने टीटीएल यंत्र खरेदीचा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु मागील काही वर्षापासून तो प्रलंबित आहे. यावर पाच कोटीचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत दोनदा ग्लोबल निविदा काढण्यात आल्या. आता तिसऱ्यांना निविदा काढण्यात आली. पण पुढे काय हा प्रश्न कायम आहे.चौकट...२५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरजअग्निशमन विभागाला ५० अधिकारी व २०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. तसेच शहराचा विस्तार व लोकसंख्या विचारात घेता अत्याधुनिक यंत्रणेची गरज आहे. विभागाला वर्षाला पाच कोटी मिळतात परंतु याचा योग्य प्रकारे विनियोग होत नसल्याचे चित्र आहे.