वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 05:39 PM2024-10-31T17:39:20+5:302024-10-31T17:41:57+5:30

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.

When will One Nation One Election and UCC come? Narendra Modi reacted to this | वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...

वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, आज गुरुवारी (३१ ऑक्टोबर) त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पहार अर्पण केला. दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 

आज या कार्यक्रमात बोलताना पीएम मोदी म्हणाले, "यावेळी राष्ट्रीय एकता दिवस एक अद्भुत योगायोग घेऊन आला आहे. आज एकीकडे आपण एकतेचा सण साजरा करत आहोत तर दुसरीकडे दिवाळीचा सणही आहे." दिव्यांचा उत्सव केवळ "देशाला उजळतो" असे नाही तर भारताला उर्वरित जगाशी जोडण्यास सुरुवात केली आहे.

काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. यामध्ये ६०० हून अधिक प्रतिष्ठित भारतीय अमेरिकन उपस्थित होते. यापार्शअवभूमीवर मोदींनी ही प्रतिक्रिया दिली. "दिवाळी हा अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो, असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले,'वन नेशन, वन इलेक्शन' प्रस्ताव, याचा उद्देश देशातील सर्व निवडणुका एकाच दिवशी किंवा विशिष्ट कालावधीत घेण्याचा आहे, लवकरच मंजूर होईल आणि प्रत्यक्षात येईल. या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती आणि या वर्षाच्या अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तो मांडला जाईल, असंही मोदी म्हणाले. 

मोदी म्हणाले, “आम्ही आता 'वन नेशन वन इलेक्शन' या दिशेने काम करत आहोत, जे भारताची लोकशाही मजबूत करेल, भारतातील संसाधनांचा सर्वोत्तम वापर करेल आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाला नवी गती देईल. "आज भारत 'UCC'कडे वाटचाल करत आहे, जो एक धर्मनिरपेक्ष नागरी संहिता आहे."

पंतप्रधान मोदी म्हणाले की,  सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय सुरक्षेला असलेले अनेक धोके दूर करण्यात आले आहेत. "दहशतवाद्यांच्या मालकांना आता माहित आहे की भारताला दुखावून काहीही फायदा होणार नाही, कारण भारत त्यांना सोडणार नाही.
 

Web Title: When will One Nation One Election and UCC come? Narendra Modi reacted to this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.