सीमा हैदरला पाकिस्तानात कधी पाठवणार? परराष्ट्र मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 09:03 PM2023-07-20T21:03:54+5:302023-07-20T21:05:18+5:30
पाकिस्तानी महिला सीमा हैदरबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.
Seema Haider Sachin : प्रियकरासाठी अवैधरित्या भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदरला तिच्या देशात कधी पाठवणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. अलीकडेच यूपीचे विशेष एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की, तिला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता परराष्ट्र मंत्रालयानेही यावर महत्वाची माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले की, आम्हाला या प्रकरणाची माहिती आहे. सीमा हैदर सध्या जामिनावर बाहेर आहे, मात्र तपास सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे यावर सध्या काहीही बोलणे घाईचे ठरेल.
VIDEO | "We are aware of this issue. She (Seema Haider) has been given bail by the court, but an investigation is underway," says Ministry of External Affairs (MEA) spokesperson Arindam Bagchi on Pakistan national Seema Haider. pic.twitter.com/UL4YEqmE6O
— Press Trust of India (@PTI_News) July 20, 2023
दरम्यान, 4 जुलै रोजी गौतम बुद्ध नगर पोलिसांनी सीमा हैदरला तिच्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याप्रकरणी अटक केली. तिचा प्रियकर सचिन मीणा यालाही अवैध स्थलांतरितांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. चार दिवसांनंतर त्या दोघांना गौतम बुद्ध नगर जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला.
सीमा हैदर आणि तिची चार मुले 13 मे पासून सचिनसोबत ग्रेटर नोएडा येथील रबुपुरा येथे भाड्याने घेतलेल्या घरात राहत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा हैदरने 13 मे रोजी कराचीहून दुबई आणि नंतर नेपाळच्या काठमांडूमार्गे भारतात प्रवेश केला. लखनौ आणि आग्रा मार्गे ती ग्रेटर नोएडाला पोहोचली.