...तर राम मंदिर कधी बांंधणार? शंकराचार्यांचा सवाल : साईबाबा मंदिर बांधण्यावर केला प्रश्न उपस्थित

By Admin | Published: October 5, 2015 12:39 AM2015-10-05T00:39:33+5:302015-10-05T00:39:33+5:30

जळगाव : देवाची उपासना सोडून आज सर्व जण मनुष्याची उपासना करीत आहे, सध्या सर्वत्र साईबाबा मंदिर उभे राहत आहे मात्र राम मंदिर कधी बांधणार? असा प्रश्न ज्योतिष व द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केला आहे. आध्यात्मिक उत्थान मंडळाच्या जळगाव शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते भक्तांना मार्गदर्शन करीत होते. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

When will you ever build a Ram temple? Question of Shankaracharya: Questions related to building Saibaba temple | ...तर राम मंदिर कधी बांंधणार? शंकराचार्यांचा सवाल : साईबाबा मंदिर बांधण्यावर केला प्रश्न उपस्थित

...तर राम मंदिर कधी बांंधणार? शंकराचार्यांचा सवाल : साईबाबा मंदिर बांधण्यावर केला प्रश्न उपस्थित

googlenewsNext
गाव : देवाची उपासना सोडून आज सर्व जण मनुष्याची उपासना करीत आहे, सध्या सर्वत्र साईबाबा मंदिर उभे राहत आहे मात्र राम मंदिर कधी बांधणार? असा प्रश्न ज्योतिष व द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केला आहे. आध्यात्मिक उत्थान मंडळाच्या जळगाव शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते भक्तांना मार्गदर्शन करीत होते. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
भगवान श्रीराम, श्रीकृष्ण यांची भक्ती सोडून आज सर्वजण साईबाबाची भक्ती करीत आहे. देवाला सोडून मनुष्याची उपसाना करु नका असे सांगून त्यांनी साईबाबांचे डीएनए पहा असेही ते म्हणाले. भक्ताला कसलीच चिंता नसते, कारण देव त्यांच्यामागे असतो, असे सांगून त्यांनी सुरदास व श्रीकृष्णाचे उदाहरण दिले.
राम मंदिर न होण्यासाठी विदेशी शक्ती
देशात राम मंदिर होऊ नये म्हणून यामागे ब्रिटनच्या एका एजन्सीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांना हाताशी धरल्याचे सांगितले. त्यासाठी सिंग यांनी मंडळ आयोगाची स्थापना केली आणि हिंदूंमध्ये फूट पाडली, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आज कुणीही साई मंदिर बांधत आहे आणि राम मंदिराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. राम मंदिर बांधत नसाल तर आयोध्या धर्मस्थान कसे राहिल असा प्रश्न करत त्यांनी साई मंदिर बांधाल तर धर्मस्थान शिर्डी होईल असा इशारा दिला. मनात धर्म आस्था ठेवाल तर हिंदू धर्म राहिल आणि तरच देशात एकता राहिल, असेही ते म्हणाले. वेदशास्त्र मानते तोच खरा हिंदू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांवर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आज पुन्हा शंकराचार्यांनी वक्तव्य केले. त्यांना आम्ही केवळ ज्ञान देत आहे, त्यांनी देशाची संस्कृती समजली पाहिजे सांगून तुम्ही केवळ पाच वर्षांसाठी आहे, आम्ही नेहमीसाठी आहे, असा इशारा दिला.
आम्ही मुस्लीम विरोधी नाही. श्रीकृष्णाचे अनेक मुस्लीम भक्त होते . रामजन्मभूमी ही खरोखर रामाचीच जन्मभूमी असल्याचे स्पष्ट झाले असून या देशात बाबर कधी आलाच नाही व त्याने तेथे मशिद बांधली नाही, असे आता न्यायालयातही स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: When will you ever build a Ram temple? Question of Shankaracharya: Questions related to building Saibaba temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.