१५ लाख रुपये कधी मिळणार?
By admin | Published: September 2, 2016 02:35 AM2016-09-02T02:35:41+5:302016-09-02T02:35:41+5:30
एका व्यक्तीने माहिती अधिकारात अर्ज दाखल करून माझ्या बँक खात्यात १५ लाख रूपये कधी जमा होणार, असा प्रश्न विचारला आहे. मुख्य माहिती आयुक्तांनी
नवी दिल्ली : एका व्यक्तीने माहिती अधिकारात अर्ज दाखल करून माझ्या बँक खात्यात १५ लाख रूपये कधी जमा होणार, असा प्रश्न विचारला आहे. मुख्य माहिती आयुक्तांनी पंतप्रधान कार्यालयाला या अर्जावर उत्तर देण्यास सांगितले आहे.
गेल्या निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, परदेशात एवढा काळा पैसा दडवून ठेवण्यात आला आहे की प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा होऊ शकतात. काळा पैसा मायदेशी परत आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. राजस्थानच्या कन्हैया लाल याने माहिती अधिकारात अर्ज करून १५ लाख रूपये माझ्या खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न केला आहे.
मोदींच्या आश्वासनाचे काय झाले हे याचिकाकर्त्यास जाणून घ्यायचे आहे, असे मुख्य माहिती आयुक्त राधा कृष्ण कुमार यांनी पंतप्रधान कार्यालयाला कळवून या अर्जावर उत्तर देण्यास सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)