काम कधी मिळणार? देशातील निम्म्या तरुणांमध्ये नाेकरीसाठीची कौशल्ये नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 11:33 AM2024-08-04T11:33:19+5:302024-08-04T11:35:27+5:30

मुद्द्याची गोष्ट :  आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार, भारतातील सुमारे 83 टक्के तरुण बेराेजगार आहेत. त्यातही उच्चशिक्षण घेतलेल्यांच्या बेराेजगारीचे प्रमाण वर्ष 2000मधील 54.2 टक्क्यांच्या तुलनेत वाढून 65.7 टक्के झाले आहे. देशातील निम्म्या तरुणांमध्ये नाेकरीसाठीची कौशल्ये नाहीत, असे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. भारताची लाेकसंख्या जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी आहे. विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर कामगारशक्तीला राेजगार आणि नाेकऱ्या उपलब्ध कशा करणार, हा माेठा प्रश्न आहे.

When will you get the job? Half of the country's youth lack employable skills | काम कधी मिळणार? देशातील निम्म्या तरुणांमध्ये नाेकरीसाठीची कौशल्ये नाहीत

काम कधी मिळणार? देशातील निम्म्या तरुणांमध्ये नाेकरीसाठीची कौशल्ये नाहीत

मनाेज रमेश जाेशी, वृत्त संपादक _

देशाला वर्ष २०४७पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सर्वांना दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही हेच लक्ष्य डाेळ्यासमाेर ठेवून काही याेजना सादर केल्या आहेत. त्यात एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे, ताे म्हणून तरुण वर्ग. बेराेजगारी फार माेठे आव्हान तरुणांसमाेर आहे. जगात सर्वाधिक लाेकसंख्या भारताची आहे. त्यात तरुणांचे प्रमाण माेठे आहे. पुढील काही वर्षांमध्ये सध्या आहेत, त्यापेक्षा दुप्पट तरुण राेजगार मागतील. त्यांच्या हाताला काम देण्यासाठी भारताची अर्थव्यवस्था सक्षम हाेणार का? हा प्रश्न आहे.

एकीकडे अर्थव्यवस्था जवळपास ६.५ ते ७ टक्क्यांनी वाढणार आहे. मात्र, आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी लागणारे काैशल्य अर्ध्या पदवीधर तरुणांकडे नाही, असे या अहवालात म्हटले आहे. देशाच्या सुमारे १.४२ अब्ज लाेकसंख्येपैकी ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुणांची संख्या ६५ टक्के आहे. म्हणजे जवळपास ९० काेटींच्या आसपास हा आकडा येताे. अहवालानुसार, ५१.२५ टक्केच तरुण राेजगाराच्या लायक आहेत. अर्ध्या तरुणांना नाेकरी मिळत नाही. पुढील १०-१२ वर्षांमध्ये आव्हान आणखी माेठे हाेणार असून, कामगारशक्तीला काम कसे देणार? हा माेठा प्रश्न आहे.

कार्यरत वयाेगटातील लाेकसंख्या म्हणजे, १५-५९ या वयाेगटांतील लाेक. देशाला विकासाच्या दिशेने नेणारी ही कामगार शक्ती आहे. देशाच्या लाेकसंख्येपैकी या शक्तीचा वाटा जवळपास ६५ टक्के आहे. मात्र, आर्थिक घडामाेडींमध्ये तरुणांचा सहभाग वर्ष २०२२ मध्ये सुमारे ३७ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार, भारतातील सुमारे ८३ टक्के तरुण बेराेजगार आहेत. त्यातही उच्चशिक्षण घेतलेल्यांच्या बेराेजगारीचे प्रमाण वर्ष २०००मधील ५४.२ टक्क्यांच्या तुलनेत वाढून ६५.७ टक्के झाले आहे. 



साधी फाईल अटॅच करता येत नाही
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने सादर केलेल्या ‘इंडिया एम्प्लाॅयमेंट २०२४’ या अहवालात एक धक्कादायक बाब नाेंदविण्यात आली. ती म्हणजे, ७५ टक्के तरुणांना फाइल अटॅच करून ई-मेलदेखील पाठविता येत नाही. पदवीधर तरुणांमध्ये किमान काैशल्याचा अभाव, हेच माेठे आव्हान भारतासमाेर राहणार आहे. 

कुठे वाढले राेजगार?
२०२२ आणि २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांच्या सहभागाचे प्रमाण आणि लाेकसंख्येचे प्रमाण एकीकडे वाढले तर दुसरीकडे बेराेजगारीत घट झाली, असे एका सर्वेक्षणात आढळले.
कृषी आणि औद्याेगिक क्षेत्रात वयस्कांच्या राेजगारांमध्ये वाढ झाली. तर सेवा क्षेत्रात घट झाली. तरुणांमध्ये कृषी आणि सेवा क्षेत्रातील राेजगार घटले, तर औद्याेगिक क्षेत्रात वाढले.

- ‘सीएमआयई’च्या जून २०२३ च्या अहवालानुसार, भारतातील कार्यरत वयोगट लोकसंख्येच्या ७९ टक्के आहे. म्हणजेच १४० कोटी लोकसंख्येत देशातील कामगारशक्ती असलेल्या कार्यरत वयोगटाची संख्या सुमारे १११ कोटी इतकी आहे. 
- १११ कोटींपैकी ९२.२ टक्के महिला आणि ३३.६ टक्के पुरुष ना रोजगार करत आहेत ना रोजगार शोधत आहेत. या श्रमशक्तीपासून अर्थव्यवस्थेसमाेरील आव्हानांना खरी सुरुवात हाेते. याबाबतीत बांगलादेश भारताच्या पुढे आहे.

Web Title: When will you get the job? Half of the country's youth lack employable skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.