भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 04:51 PM2024-09-19T16:51:12+5:302024-09-19T16:55:57+5:30
पूर्वीच्या तुलनेत आता शारीरिक संबंधांदरम्यान कंडोमचा वापर कमी होत असल्याचेही या अहवालात म्हणण्यात आले आहे...
जागतिक आरोग्य संघटना अर्थात (WHO) नियमितपणे एक अहवाल सादर करत असते. यावेळी या अहवालात, देशातील कोणकोणत्या राज्यांत कंडोमचा सर्वाधिक वापर केला जातो, हे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर, पूर्वीच्या तुलनेत आता शारीरिक संबंधांदरम्यान कंडोमचा वापर कमी होत असल्याचेही या अहवालात म्हणण्यात आले आहे. आरोग्य विभागातील लोकांना कंडोमच्या वापरासंदर्भात सातत्याने जागरूक केले जात आहे. मात्र तरीही याचा वापर कमी होताना दिसत आहे.
या राज्यात होतो कंडोमचा सर्वाधिक वापर -
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाने (2021-22) केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, दादरा नगर हवेली येथे भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक लोक कंडोम खरेदी करतात. यानंतर आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. जेथे मोठ्या प्रमाणावर लोक कंडोम खरोदी करतात.
दादरा नागर हवेलीत किती होतो कंडोमचा वापर? -
या सर्वेक्षणात प्रत्येक राज्यातील विविध वयोगटाच्या 10 हजार जोडप्यांशी बोलण्यात आले. यानुसार, दादरा नगर हवेलीमध्ये 10 हजार जोडप्यांपैकी 993 जोडपी शारीरिकसंबंध प्रस्थापित करताना कंडोम वापरतात. दुसरा क्रमांक आंध्र प्रदेशचा लागतो. येथे 10 हजार पैकी 978 जोडपे कंडोमचा वापर करतात. तर कर्नाटकचा क्रमांक 15वा आहे. येथे 10 हजार जोडप्यांपैकी केवळ 307 जोडपेच कंडोमचा वापर करतात. महत्वाचे म्हणजे, या अहवालानुसार, भारतातील 6 टक्के लोकांना कंडोबसंदर्भात माहितीच नाही.
भारतात दरवर्षी सरासरी 33.07 कोटी कंडोम खरेदी केले जातात. एकट्या उत्तर प्रदेशचा विचार करता, येथे दरवर्षी 5.3 कोटी कंडोम वापरले जातात. हा आकडा इतर राज्यांच्या तुलनेत खूप अधिक आहे. येथील आरोग्य केंद्र आणि सरकारी रुग्णालयांमध्ये कंडोमचे मोफत वाटपही केले जाते. मात्र, सर्वेक्षणानुसार आता कंडोमचा वापर कमी होताना दिसत आहे. पुद्दुचेरीमध्ये 10,000 जोडप्यांपैकी केवळ 960, पंजाबमध्ये 895, चंदीगडमध्ये 822, हरियाणात 685, हिमाचल प्रदेशमध्ये 567, राजस्थानात 514 तर गुजरातमध्ये 430 लोक कंडोमचा वापर करतात.