चंद्रयान-3 आता कुठपर्यंत पोहोचलं? थेट ट्रॅकरमध्ये पाहा दिशा, वेग आणि मार्ग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 04:40 PM2023-08-03T16:40:35+5:302023-08-03T16:54:04+5:30

चंद्रयान-३ कुठे पोहोचलं? कोणत्या मार्गावर आहे? हे तुम्ही लाइव्ह ट्रॅकरमध्ये पाहू शकणार आहात

Where did Chandrayaan-3 reach now see direction speed and route directly live tracker | चंद्रयान-3 आता कुठपर्यंत पोहोचलं? थेट ट्रॅकरमध्ये पाहा दिशा, वेग आणि मार्ग...

चंद्रयान-3 आता कुठपर्यंत पोहोचलं? थेट ट्रॅकरमध्ये पाहा दिशा, वेग आणि मार्ग...

googlenewsNext

Chandrayaan 3 Location Live Tracker: चंद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी फक्त 20 दिवस उरले आहेत. दोन दिवसांनंतर ते चंद्राची कक्षा पकडण्याचा प्रयत्न करेल. या कामात चंद्रयान यशस्वी होईल अशी 100 टक्के आशा आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी यापूर्वी दोनदा हे काम यशस्वीपणे केले आहे. पण चंद्रयान-३ आता कुठपर्यंत पोहोचले आहे? अंतराळात ते कोणत्या मार्गाने जात आहे? यासंबंधी तुम्ही लाइव्ह ट्रॅकरमध्ये पाहू शकता.

इस्रोचे बेंगळुरू स्थित इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) चंद्रयानचा वेग, दिशा आणि ठिकाण यावर सतत लक्ष ठेवत आहे. इस्रोने सर्वसामान्यांसाठी लाइव्ह ट्रॅकर लाँच केला आहे. ज्याद्वारे तुम्ही चंद्रयान-3 सध्या अंतराळात कुठे आहे हे पाहू शकता. तसेच चंद्रावर पोहोचायला त्याला अजून किती दिवस उरले आहेत, हे देखील पाहू शकता.

चंद्रयान-3 सध्या ताशी 37,200 किलोमीटर वेगाने चंद्राकडे जात आहे. हा प्रवास सध्या महामार्गावरूनच होत आहे. मात्र दोन दिवसांनी तो चंद्राच्या कक्षेत येईल. म्हणजेच 5 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6.59 वाजता, चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 40 हजार किलोमीटर दूर असेल. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती येथून सुरू होते.

त्याचा वेग 5 ते 23 ऑगस्टपर्यंत कमी-कमी होत जाणार!

चंद्राची कक्षा पकडण्यासाठी चंद्रयान-3 चा वेग ताशी 7200 ते 3600 किलोमीटर इतका असावा. 5 ते 23 ऑगस्टपर्यंत चंद्रयानचा वेग सातत्याने कमी होणार आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीनुसार सध्या चंद्रयानचा वेग जास्त आहे. चंद्रयान-3 चा वेग 2 किंवा 1 किलोमीटर प्रति सेकंद इतका कमी करावा लागेल. या वेगाने चंद्रयान-3 चंद्राची कक्षा पकडेल. त्यानंतर हळूहळू ते दक्षिण ध्रुवाजवळ उतरवले जाईल.

चंद्राची कक्षा न मिळाल्यास चंद्रयान-३ परतीच्या प्रवासावर

चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा 6 पट कमी आहे. त्यामुळे चंद्रयान-३ चा वेग कमी करावा लागणार आहे. तसे न झाल्यास चंद्रयान-३ चंद्राच्या पुढे जाईल. खरं तर, चंद्रयान-3 सध्या 288 x 369328 किलोमीटर अंतराच्या ट्रान्स लुनार ट्रॅजेक्टोरीमध्ये प्रवास करत आहे. जर त्याने चंद्राची कक्षा पकडली नाही तर 230 तासांनंतर ते पृथ्वीच्या पाचव्या कक्षेत परत येईल. इस्रोचे शास्त्रज्ञ आणखी एक प्रयत्न करून ते चंद्रावर परत पाठवू शकतील.

दुसरी संधी मिळणार!

इस्रोच्या सूत्रांनी सांगितले की, इतिहासात... कोणत्याही देशांनी किंवा अंतराळ संस्थांनी त्यांच्या रॉकेटद्वारे थेट चंद्राच्या दिशेने यान पाठवले, त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तीनपैकी एक मोहीम अयशस्वी झाली. पण इस्रोने जो मार्ग आणि पद्धत निवडली आहे, त्यात अपयश येण्याची शक्यता फारच कमी आहे. येथे पुन्हा मिशन पूर्ण करण्याची संधी असणार आहे.

17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे केले जातील

5 ऑगस्ट रोजी, चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 40 हजार किलोमीटर अंतरावरील लंबवर्तुळाकार कक्षेचा ताबा घेईल. यानंतर 17 ऑगस्टपर्यंत परिक्रमा चालणार आहे. 17 तारखेलाच चंद्रयान-3 100 किमीच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल त्याच दिवशी वेगळे होतील. लँडर मॉड्यूलचे 18 आणि 20 ऑगस्ट रोजी डिऑर्बिटिंग होईल. म्हणजेच, चंद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल हळूहळू चंद्राच्या 100x30 किमीच्या कक्षेत जाईल. यानंतर, 23 ऑगस्ट रोजी सुमारे सव्वा सहा वाजता लँडिंग होईल.

Web Title: Where did Chandrayaan-3 reach now see direction speed and route directly live tracker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.