देशात कुठे उष्णतेचा यलो अलर्ट, कुठे ऊन-पावसाचा खेळ !  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 06:25 AM2023-05-23T06:25:39+5:302023-05-23T06:25:52+5:30

नरम-गरम हवामानामुळे ठिकठिकाणचे नागरिक हैराण 

Where in the country is the yellow alert of heat, where is the game of heat and rain! | देशात कुठे उष्णतेचा यलो अलर्ट, कुठे ऊन-पावसाचा खेळ !  

देशात कुठे उष्णतेचा यलो अलर्ट, कुठे ऊन-पावसाचा खेळ !  

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सध्या देशातील विविध राज्यांमध्ये हवामानाचे वेगवेगळे नमुने पाहायला मिळत आहेत. प्रखर सूर्यप्रकाशामुळे बिहारमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे, तर मध्य प्रदेशात पाऊस पडत आहे. त्याचवेळी झारखंडची राजधानी रांचीमध्ये रविवार हा सर्वांत उष्ण दिवस ठरला. दिल्लीत तीव्र उष्णतेची लाट आली असून, पारा ४३ ते ४६ अंश सेल्सियसदरम्यान पोहोचल्याने दिल्लीला ‘यलो कार्ड’ दाखवले आहे. येत्या काही दिवसांत कुठे पाऊस, वादळी वारे, तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

दिवसा ऊन, संध्याकाळी पाऊस
n रविवारी भोपाळशिवाय राजगड, इंदूर, ग्वाल्हेर, छतरपूर, नौगावसह अनेक शहरांमध्ये हलका पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यात भोपाळच्या मोठ्या तलावात धावणारी क्रूझ माशांच्या जाळ्यात अडकली. 
n सुमारे ८० लोक क्रूझमध्ये तीन तास अडकून पडले होते, नंतर त्यांची मोटर बोटीने सुटका करण्यात आली. इंदूरमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या पावसानंतर तापमान ३५ अंशांवर घसरले. झारखंडमध्ये रांची येथे २३ ते २५ मेपर्यंत पाऊस पडेल; पण पारा घसरणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

वायव्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता
वायव्य भारतातील पश्चिमी अडथळ्यांमुळे पूर्व हिमालय भागात मुसळधार पाऊस आणि गडगडाट अपेक्षित आहे, तर वायव्य भारतात २३ ते २५ मेदरम्यान पावसाची शक्यता आहे. 

नवी दिल्लीत तापमान प्रचंड वाढल्याने नागरिकांच्या जिवाची काहिली होत आहे. लोक पाण्यासाठी मोठ्या बाटल्या गोळा करीत आहेत. उन्हामुळे त्रस्त झालेल्या जालंधर येथील मुलींनी डोक्यावर ओढण्या घेतल्या होत्या.

Web Title: Where in the country is the yellow alert of heat, where is the game of heat and rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.