जगात निवडणुकीवर सर्वाधिक खर्च कुठे होतो? अहवालातून समोर आली महत्त्वाची आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 08:54 AM2024-03-17T08:54:11+5:302024-03-17T08:54:52+5:30
कोणत्या निवडणुकांवर किती खर्च? वाचा सविस्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: निवडणूक म्हटली की, पैसा हा आलाच. प्रशासनाला निवडणूक प्रक्रिया राबविण्यापासून ते राजकीय पक्षांना प्रचारापर्यंत मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. इतर देशांचा विचार केल्यास जगात निवडणुकीवर सर्वाधिक खर्च हा भारतात होत असल्याचे सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या अहवालात म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशात सुमारे १.२० लाख कोटींचा खर्च होण्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे. त्यात सर्वाधिक वाटा हा प्रचाराचा राहणार आहे.
कोणत्या निवडणुकांवर किती खर्च?
- विधानसभा - ३लाख कोटी - ४५०० मतदारसंघ
- लोकसभा - १.२०लाख कोटी - ५४३ मतदारसंघ
- महापालिका - १ लाख कोटी - ५०० मतदारसंघ
खर्चाची मर्यादा किती?
- लोकसभा निवडणुकीला एक उमेदवार ५० ते ७० लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो. परंतु, ही आकडेवारी राज्यांनुसार बदलू शकते.
- अरुणाचल प्रदेश, गोवा आणि सिक्कीम (५४ लाख) वगळता अन्य राज्यांमध्ये कमाल खर्चाची मर्यादा ७० लाख आहे.
- दिल्ली (७० लाख) वगळता केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा खर्च ५४ लाखापर्यंत निश्चित केला आहे.
- विधानसभा निडणुकीसाठी खर्चाची मर्यादा २० ते २८ लाखांदरम्यान आहे.
१० लाख कोटी
देशात ग्रामपंचायतीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत एकूण खर्च १० लाख कोटींच्या पुढे जातो. ही रक्कम काही राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही अधिक आहे.