असहिष्णुता कुठे आहे? - जेटली
By admin | Published: November 4, 2015 02:10 AM2015-11-04T02:10:44+5:302015-11-04T02:10:44+5:30
भारत कधीही असहिष्णू राहणार नाही, असे सांगताना भारतात असहिष्णुता वाढल्याचा काँग्रेसचा आरोप केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी फेटाळून लावला.
नवी दिल्ली : भारत कधीही असहिष्णू राहणार नाही, असे सांगताना भारतात असहिष्णुता वाढल्याचा काँग्रेसचा आरोप केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी फेटाळून लावला. विरोधकांनी राजकीय लढाई राजकीय पातळीवरच लढली पाहिजे, असे सांगून ‘कुठे आहे असहिष्णुता,’ असा सवालही जेटली यांनी केला.
पुरस्कार परत करण्याचे समर्थन करता येणार नाही. राष्ट्रीय परिस्थिती अगदी शांततापूर्ण आहे, असे जेटली म्हणाले.
देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण होण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार आहे, अशा स्पष्ट शब्दांत काँग्रेसने मंगळवारी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, भाजपा आणि रा. स्व. संघ देशात असहिष्णुतेच्या अपसंस्कृतीला प्रोत्साहन करीत आहेत.