ज्या शाळेत महिला स्टाफ, त्या शाळेत पुरुष शिक्षकांना घ्यावी लागते 'सॅरीडॉन'; शिक्षणमंत्र्याचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:44 AM2021-10-13T11:44:21+5:302021-10-13T11:45:26+5:30
"महिलांच्या भांडणांमुळे शाळेतील पुरुष स्टॉफ अत्यंत त्रस्त असतो. महिलांच्या भांडणांमुळे तर अनेक वेळा पुरुष शिक्षक आणि प्राचार्यांवर सॅरीडॉन टॅबलेटही घेण्याची वेळ येते."
कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनंतर आता राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा (Govind singh Dotasara) यांचे वक्तव्य चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त बोलताना ते म्हणाले, महिला भांडखोर असतात. त्यांचा हा गूणच त्यांना पुरुषांच्या पुढे जाण्यापासून रोखतो. ज्या शाळांमध्ये अधिक महिला कर्मचारी असतात, तेथे भांडणाचे प्रमाण अधिक असते. महिलांच्या शाळेतील भांडणांसंदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी येतात. जर आपण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा, केली तर पुरुषांच्याही पुढे असाल, असेही डोटासरा म्हणाले.
पुरुष शिक्षकांना आणि प्राचार्यांना घ्यावी लागते 'सैरेडॉन' -
यावेळी डोटासरा गमतीत म्हणाले, महिलांच्या भांडणांमुळे शाळेतील पुरुष स्टॉफ अत्यंत त्रस्त असतो. महिलांच्या भांडणांमुळे तर अनेक वेळा पुरुष शिक्षक आणि प्राचार्यांवर सॅरीडॉन टॅबलेटही घेण्याची वेळ येते. ते म्हणाले, सरकारने महिलांसाठी योजना आणल्या आहेत. सरकार महिलांना प्राधान्य देत आहे. त्यांनी या सर्व गोष्टींतून बाहेर पडून पुरुषांच्याही पुढे जावे.
#WATCH | Govt introduced policy for women. They're given priority.But female staff have conflicts among themselves. Where there's female staff, either Principal or teachers take 'Saridon'. If they overcome this, they'll be ahead of men: Rajasthan Education Min GS Dotasara (11.10) pic.twitter.com/CqQnkk1Nvz
— ANI (@ANI) October 13, 2021
कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांचेही वक्तव्य आले होते चर्चेत -
यापूर्वी कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांचे वक्तव्यही चर्चेत आले होते. ते म्हटले होते, आधुनिक भारतीय महिला मुलांना जन्म देऊ इच्छित नाहीत. एकतर त्यांची अविवाहित राहण्याची इच्छा असते अथवा लग्नानंतरही त्यांची मुलांना जन्म देण्याची इच्छा नसते. त्यांना सरोगसीद्वारे मुले हवी आहेत. आपल्या विचारात हा बदल योग्य नाही, असे डॉ. के. सुधाकर यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बोलताना म्हटले होते.