"शिकलेल्या मुस्लीम मुलांना हिंदू मुली जाळ्यात ओढतात;" लव्ह जिहादबद्दल माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 01:11 PM2022-03-28T13:11:01+5:302022-03-28T13:13:04+5:30
"हिजाब गरजेचं आहे का नाही हे न्यायाधीश थोडी सांगणार, हे तर मौलाना सांगतील. मौलाना जर कायद्याचे निर्णय द्यायला लागले तर हे योग्य ठरेल का?", कुरैशी यांचा सवाल.
भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस.व्हाय. कुरैसी हे आपल्या लव्ह जिहादच्या वक्तव्यावरून चर्चेत आले आहेत. "माझ्या आणि माझ्या पत्नीमध्ये लव्ह जिहाद आहे. माझ्या घरी माझ्या मुलीदेखील लव्ह जिहाद करतात. प्रेमाची कोणतीही मर्यादा नसते. तसं पाहायला गेलं तर मुस्लीम मुलींना याचं सर्वाधिक नुकसान आहे. शिक्षित मुस्ली मुलांना शिक्षित हिंदू मुली आपल्या जाळ्यात ओढतात. मुस्लीम महिल्यांच्या बाजूनं याकडे कोणीही पाहत नाही," असं कुरैशी म्हणाले.
यावेळी डॉ. कुरैशी यांनी मध्यप्रदेशात लागू करण्यात आलेल्या लव्ह जिहादवरील कायद्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. दैनिक भास्करला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "मुस्लिमांची जितकी बदनामी करण्याचा प्रयत्न करा तितकी कमी आहे. यासाठीच हा कायदा आणण्यात आला. कितीतरी अशा घटना आहेत, त्या मुलगीच सांगते की मी माझ्या मुस्लीम पतीसोबतच राहणार आहे," असंही ते म्हणाले.
'हिजाब कुराणचा भाग आहे का?'
"हिजाब हा कुराणचा भाग नाही. परंतु महिला आणि पुरुष दोघांनीही सभ्य कपडे परिधान केले पाहिजे असं त्यात सांगण्यात आलं आहे. महाविद्यालयात यावर बंदीबाबत सांगण्यात आलं. परंतु त्या ठइकाणी गणवेश तर नसतो. शाळेच्या गणवेशात शीखांची पगडी, भांगेत कुंकू लावण्याची परवानगी आहे, तर हिजाबमध्ये काय समस्या आहे. हिजाब गरजेचं आहे का नाही हे न्यायाधीश थोडी सांगणार, हे तर मौलाना सांगतील. मौलाना जर कायद्याचे निर्णय द्यायला लागले तर हे योग्य ठरेल का?," असंही ते म्हणाले.
'मुस्लिमांची संख्या तेजीनं वाढतेय का?'
मुलाखतीदरम्यान त्यांना हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांची संख्या तेजीनं वाढतेय का? असा प्रश्नही विचारण्यात आला. "मुस्लीम अनेक मुलांना जन्माला घालतात हा प्रपोगंडा अनेक वर्षांपासून चालत आलाय. चार-चार लग्न केली जातात. हम पाच हमारे पच्चीस असं स्लोगन तयार करण्यात आलं होतं. परंतु संशोधन हे सांगत नाही. मुस्लिमांचं फॅमिली प्लॅनिंग कमी आहे हे सत्य आहे. परंतु त्याचा धर्माशी कोणताही संबंध नाही. १९९१ मध्ये मुस्लिमांच्या तुलनेत हिंदू ३० कोटींनी जास्त होतो आणि आता ती संख्या ८० कोटी झाली आहे. यावरून हिंदूंपेक्षा मुस्लिमांची संख्या जास्त होईल हे कुठे दिसून येतं?," असं प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.
"मी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक दिनेश सिंह यांच्याकडून एक मॅथेमॅटिकल मॉडेल बनवून घेतलं होतं. किती कालावधीत मुस्लिमांची मेजॉरिटी होईल हे जाणून घेण्यासाठी ते केलं होतं. मी तर देशाचा पंतप्रधानच बनेन असा विचार केलेला. परंतु त्यांनी सांगितलं १००० वर्षांपर्यंत बनूच शकत नाही," असंही कुरैशी म्हणाले.