"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 18:12 IST2025-04-22T18:11:34+5:302025-04-22T18:12:19+5:30
दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) वक्फ कायद्याविरोधात (Waqf Act) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अनेक राज्यांतून आलेल्या मुस्लीम नेत्यांनी आणि मौलानांनी वक्फ कायद्याविरोधात आपले मत व्यक्त केले.

"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
भारतीय जनता पक्षाची एक व्यकी संसदेत म्हणाली की, एका विशेष मुस्लीम देशात वक्फ नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की, आपल्या सौदी दौऱ्यादरम्यान क्राउन प्रिन्स यांना विचारा की, मदीना वक्फच्या जमीनीवर आहे? वक्फ प्रत्येक मुस्लीम देशात आहे. मग तो लोकशाही असलेला देश असो अथवा मुस्लीम राजेशाही असलेले साम्राज्य, असे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेस यांनी म्हटले आहे. ते दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये 'वक्फ बचाओ सम्मेलना'ला संबोधित करत होते.
दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) वक्फ कायद्याविरोधात (Waqf Act) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अनेक राज्यांतून आलेल्या मुस्लीम नेत्यांनी आणि मौलानांनी वक्फ कायद्याविरोधात आपले मत व्यक्त केले. या सर्वांनी वक्फ कायदा हा संविधान आणि मुस्लीम विरोधी असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "मोदी जी किंग सलमान यांच्यासोबत ‘हबीबी’ म्हणत बोलतील आणि भारतात येऊन म्हणतात, मुस्लिमांना कपड्यांवरून ओळखा. आपण सऊदी अरेबियामध्ये आहात, आपल्याला हवे असल्यास, आपण क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडून काही गोष्टींची पुष्टी करू शकता."
यावेळी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी, जमीयत उलेमाच्या दोन्ही गटांचे प्रमुख मौलाना अरशद मदनी आणि मौलाना महमूद मदनी आणि ऐआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यासह इतरही काही मुस्लीम संघटनांचे नेते उपस्थित होते.