कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 17:52 IST2024-10-06T17:50:21+5:302024-10-06T17:52:49+5:30
"जर आपल्याला उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि हंगेरिया तसेच अमेरिकेन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यासोबत डिनर करण्याची संधी मिळाली तर आपण कुणासोबत डिनर कराल? यावर जयशंकर यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे. जे एकूण सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला..."

कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (Jaishankar Video ) हे हे आपल्या मुत्सद्दी उत्तरांसाठी नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही त्यांचे एक उत्तर जबरदस्त चर्चेत आले आहे. खरे तर, जयशंकर यांना एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला की, जर आपल्याला उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि हंगेरिया तसेच अमेरिकेन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यासोबत डिनर करण्याची संधी मिळाली तर आपण कुणासोबत डिनर कराल? यावर जयशंकर यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे. जे एकूण सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक नेते, अशा शब्दात वर्णन केले. यावेळी त्यांना, किम जोंग की जॉर्ज सोरोस कुणासोबत डिनर करायला आवडेल? असे विचारले असता, सध्या नवरात्र सुरू आहे. मी उपवासाला प्राधान्य देईन, असे उत्तर त्यांनी दिले. त्यांच्या या उत्तराला प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
बघा व्हिडिओ -
हजरजबाबीपणाचं कौतुक -
जयशंकर यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. लोक त्यांचे अत्यंत कौतुक करत आहेत. जयशंकर यांच्या हजहजबाबीपणाला तोड नाही, असे एका युजरने म्हटले आहे.
पाकिस्तानातील एससीओ परिषदेसंदर्भात काय म्हणाले जयशंकर? -
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर SCO शिखर परिषदेसाठी पाकिस्तानला जाणार आहेत. यासंदर्भात, आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा करणार का, असे विचारले असता, जयशंकर म्हणाले, आपण पाकिस्तानसोबत कसल्याही प्रकारची चर्चा करणार नाही. ही एक बहुपक्षीय परिषद आहे आणि SCO चा चांगला सदस्य असल्याने मी तिथे जात आहे. पाकिस्तानसोबत चर्चा करायला नाही.