PM मोदींचे मंत्री शपथ घेत असताना मागे दिसलेला प्राणी कोणता?; मांजर, कुत्रा की बिबट्या?; व्हिडीओ पाहून चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 03:49 PM2024-06-10T15:49:21+5:302024-06-10T15:52:50+5:30
...याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जो प्राणी दिसत आहे, तो नेमका मांजर आहे, कुत्रा आहे की बिबट्या? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर, रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एडीए सरकार स्थापन झाले. नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या समवेत एकूण ७२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. ६ हजारांहून अधिक पाहुणे या अद्भूत सोहळ्याचे साक्षिदार झाले. केवळ हे सहा हजार पाहुणेच नाही, तर एका 'अनामंत्रित' पाहुण्यानेही या कार्यक्रमाला हजेरी लावली. याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जो प्राणी दिसत आहे, तो नेमका मांजर आहे, कुत्रा आहे की बिबट्या? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
व्हायरल होत असलेल्या या 12 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मंत्री दुर्गादास उईके शपथ घेतल्यानंतर स्वाक्षरी करताना दिसत आहेत. स्वक्षरी केल्यानंतर, ते उठतात आणि राष्ट्रपतींना नमस्कार करण्यासाठी जाऊ लागतात, त्याच वेळी त्यांच्या मागे असलेल्या पायऱ्यांवरून एक वन्य प्राणी जाताना दिसत आहे. मात्र, तो नेमका कोणता वन्य प्राणी आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण तो मांजर, कुत्रा अथवा बिबट्या असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Is that a wild animal in the background, strolling in the Rashtrapati Bhawan? pic.twitter.com/OPIHm40RhV
— We, the people of India (@India_Policy) June 10, 2024
जर तो प्राणी बिबट्या असेल, तर हा सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अत्यंत चिंतेचा विषय आहे.
अल्मोड़ा संसदीय क्षेत्र से माननीय सांसद श्री @AjayTamtaBJP जी को केंद्रीय राज्य मंत्री पद की शपथ लेने पर हार्दिक बधाई एवं उज्ज्वल कार्यकाल हेतु अनंत शुभकामनाएं! pic.twitter.com/zL3MsOtPD3
— Pushkar Singh Dhami (Modi Ka Parivar) (@pushkardhami) June 9, 2024